ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 75 लाख 97 हजार 63 इतकी झाली आहे. त्यात एकूण 1 लाख 15 हजार 197 मृतांचा समावेश आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांत कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोनामुळे 600पेक्षा कमी मृत्यूची नोंद करण्यात आली. तर सलग चौथ्या दिवशी अॅक्टिवह रुग्णाची संख्या 8 लाखांपेक्षा कमी राहिली आहे.

COVID-19 news from across the nation
भारतातील कोरोनाची परिस्थिती
author img

By

Published : Oct 21, 2020, 1:29 AM IST

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनेतेने मास्क घालावा, अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच त्यांनी कोरोनाचा प्रभाव अजून आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो, अशी चेतावणीही दिली.

COVID-19 news from across the nation
भारतातील कोरोनाची परिस्थिती

जगात सर्वाधिक जास्त कोरोनावर मात केलेल्यांची संख्या भारतात आहे. तसेच कोणत्याही देशात घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या बाबतीत आम्ही दुसर्‍या स्थानावर आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, बर्‍याच देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत भारतामध्ये दर दशलक्ष 310 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. जी जागतिक स्तराच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

कोरोनाचा मृत्यूदर 1 सप्टेंबरला 1.77 टक्क्यांवरून घटून आतापर्यंत 1.22 टक्क्यांवर आला आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, देशांत मागील 24 तासांत 50 हजारांहून कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली, जी मागील 84 दिवसांनंतर नोंदवण्यात आली, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

जुलैच्या शेवटी पहिल्यांदा देशात 50 हजारांहून कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. सोमवारी 47 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, जी जवळपास मागील तीन महिन्यांतील कमी रुग्णसंख्या आहे.

  • दिल्ली

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी निरीक्षण नोंदवले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना देण्यात आलेला अंतरिम जामीन आणि पॅरोलला वाढवण्याचा आदेशाला आता रद्द करायला हवा. कारण, नवी दिल्लीतील तुरूंगांतील कोरोनाबाधितांची संख्या आता फक्त राहिली आहे.

तुरुंग विभागाचे महासंचालक यांच्यानुसार, 6 हजार 700 कैदी जामीन किंवा पॅरोलवर बाहेर आहेत आणि उच्च न्यायालयाच्या एक पूर्ण पीठाद्वारे वेळेनुसार मंजूर करण्यात आलेले आदेशाला पाहता बाहेर येत आहेत.

कोरोना विषाणू सोबत अन्य आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या 25 मार्चच्या स्तरावर पोहोचली आहे. परिणामी, कोरोना आयसीयू बेडच्या 54 टक्क्यांच्या तुलनेत नॉन कोविड (आयसीयूत) जवळपास 75 टक्के बेड खाली नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी उपलब्ध आयसीयू बेडच्या माहितीसाठी दिल्ली सरकारने 'अपना दिल्ली कोरोना अ‌‌ॅप'मध्ये नॉन कोविड आयसीयू बेडची उपलब्धता किती आहे, याबाबत माहिती अपडेट करणे सुरू केले आहे.

न्यायालयाने हा आदेश तेव्हा दिला, जेव्हा कोरोनाच्या बेडची उपलब्धता निश्चित करण्यासाठी 33 मोठ्या रुग्णालयांमध्ये 80 टक्के आयसीयू बेड आरक्षित करण्यासाठीच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

  • महाराष्ट्र

मुंबई - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी सांगितले, मला हे सांगताना आनंद होत आहे, राष्ट्रीय ट्रांसपोर्टर महिलांना मुंबईत 21 ऑक्टोबरपासून सकाळी 11वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत आणि सायंकाली 7 वाजेनंतर उपनगरीय रेल्वेत यात्रा करायला परवानगी देणार आहे. तसेच आम्ही नेहमीच तयार होतो आणि आज महाराष्ट्र सरकारकडून पत्र मिळाल्यानंतर आम्ही याला परवानगी दिली आहे.

  • कर्नाटक

बंगळुरू - शेतकरी आणि कम्युनिस्ट नेता मारुति मनपाडे यांचे मंगलवार सकाळी सोलापूर येथे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाने मंगळवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांना प्रोत्साहन देण्यासाठी तिकिटांवर कोरोना जागरूकता संदेश छापण्यास सुरुवात केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.