ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनाचे अपडेट; २२ मार्चनंतर सर्वात कमी १.५२ टक्के मृत्यूदर

कोरोनाच्या लढ्यात दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर टाळेबंदींतर सर्वात कमी राहिला आहे.

कोरोना अपडेट न्यूज
कोरोना अपडेट न्यूज
author img

By

Published : Oct 16, 2020, 11:36 PM IST

हैदराबाद - देशात प्रति दहा लाख कोरोनाच्या लोकसंख्येत १ हजार एवढा मृत्यूदर आहे. दहा लाख लोकसंख्येपैकी मृत्यूदराचे प्रमाण हे ४ ऑक्टोबरनंतर सर्वात कमी असलेल्या देशांपैकी भारत आहे. देशातील एकूण मृत्यूदराचे प्रमाण हे २२ मार्चनंतर सर्वात कमी १.५२ टक्के असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या मृत्यूदराचे प्रमाण हे देशाच्या इतर भागांच्या तुलनेने कमी आहे.

दिल्ली -

नवी दिल्ली - राज्यसभेचे खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते घरी विलगीकरणात राहिले आहेत. कोरोनाची लागण झालेले ७१ वर्षीय आझाद हे काँग्रेसचे चौथे वरिष्ठ नेते आहेत. यापूर्वी अहमद पटेल, मोतीलाल वोरा आणि अभिषेक सिंघवी यांना कोरोनाची लागण झाली होती.

महाराष्ट्र-

मुंबई- मुंबई महापालिकेने रेस्टॉरंट, बार व हॉटेल सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजता व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. राज्य सरकारने टाळेबंदी खुली करत मिशन बिगिन प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेत दुकानदारांना दुकाने सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर, ठाण्यात पहिले कोरोना केअर सेंटर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

कोरोना अपडेट न्यूज
कोरोना अपडेट न्यूज

बिहार-

पाटणा- बिहारचे पंचायत राज मंत्री कपील देव कामत यांचे कोरोनाने एम्समध्ये शुक्रवारी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते मृत्यूसमयी ७० वर्षांचे होते.

केरळ-

तिरवनंतपुरम- केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजनय म्हणाले, की शबरीमालामध्ये सहभाग घेणाऱ्या यात्रेकरूंना कोरोना निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तसेच त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रही शबरीमालाचा डोंगर चढण्यापूर्वी द्यावे लागणार आहे.

कर्नाटक-

बंगळुरू- कोडागु उपायुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व पर्यटन केंद्र हे १७ ते २६ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम बंगाल-

कोलकाता- पश्चिम बंगाल सरकारने दुर्गा पूजा आयोजकांना ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधील ७५ टक्के निधी हा कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या साधनांसाठी आणि सार्वजनिक शिस्त ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेवर खर्च करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाने दुर्गा पूजा आयोजकांना आदेश दिले आहेत. दुर्गा उत्सवाच्या सर्व खर्चांची बिलेही ही आयोजकांना लेखापरीक्षकांना देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

ओडिशा-

भुवनेश्वर- ओडिशामध्ये एका दिवसात २ हजार १३८ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही गेल्या दीड महिन्यात नव्या कोरोना रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे.

उत्तराखंड

देहरादून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कोरोनाच्या उपाययोजनासंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. सर्व धार्मिक आणि पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या घरांवर कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी स्टिकर लावण्यात यावेत, असे रावत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.