ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 71 लाख 75 हजार पार - देशातील कोरोना अपडेट

देशात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 71 लाख 75 हजार 881 वर पोहोचला आहे. त्यापैकी 8 लाख 38 हजार 729 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 1 लाख 9 हजार 856 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 14, 2020, 6:00 AM IST

हैदराबाद - भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 71लाख 75 हजार 881 वर पोहोचला आहे. त्यापैकी सध्या 8 लाख 38 हजार 729 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एकूण बाधित रुग्णांपैकी 62 लाख 27 हजार 296 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे तर, 1 लाख 9 हजार 856 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यापैकी 706 जणांचा मागील 24 तासांत मृत्यू झाला आहे.

  • महाराष्ट्र
    संपादित छायाचित्र
    संपादित छायाचित्र

महाराष्ट्र राज्यामध्ये मागील 24 तासांत 8 हजार 522 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 15 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 2 लाख 5 हजार 415 सक्रिय रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

  • दिल्ली

दिल्लीमध्ये मागील 24 तासांत 3 हजार 36 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. सध्या दिल्लीमधील एकूण बाधितांचा आकडा 3 लाख 14 हजार 224 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 5 हजार 854 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • हरयाणा

हरयाणा राज्यात मंगळवारी 1 हजार 81 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या हरयाणामध्ये 10 हजार 319 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश राज्यात मंगळवारी 184 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली. सध्या राज्यात 2 हजार 507 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मंगळवारी तंत्रशिक्षण मंत्री मलाल मारकंडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांनी संपर्कातील सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

  • मध्य प्रदेश

मध्य प्रदेश राज्यात मंगळवारी 1 हजार 463 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. राज्यातील एकूण 1 लाख 49 हजार 761 झाली आहे. मंगळवारी राज्यात 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2 हजार 671 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 1 हाजर 708 जण मंगळवारी कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात 14 हजार 661 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • राजस्थान

मंगळवारी राजस्थान राज्यात 2 हजार 35 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 1 लाख 63 हजार 219 वर पोहोचली आहे. तर 14 रुग्णांनी मागील 24 तासांत आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 679 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • उत्तराखंड

राज्यात 294 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून एकूण बाधितांचा आकडा 55 हजार 641 वर पोहोचला आहे. त्यापैकी 48 हजार 283 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 782 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 6 हजार 576 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.