हैदराबाद - देशाने कोरोना रुग्णसंख्येत ६५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात नव्या ७५ हजार ८२९ रुग्णांची नोंद झाली असून ९४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 65 लाख 49 हजार 374 वर पोहोचली असून सध्या देशात 9 लाख 37 हजार 625 सक्रिय रुग्ण आहेत. सलग १३व्या दिवशी भारताने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी करण्यात क्रमांक कायम ठेवला असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ८३.८ वर पोहोचला आहे. आजपासून अनलॉक-५ला सुरुवात झाली आहे. जगभरात सध्या कोरोनाचे ३.४७ कोटी रुग्ण आहेत.
![भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9048737_sdahdh.jpg)
दिल्ली -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. अनलॉक-५ ची घोषणा करतानाच केंद्राने काही अधिकार राज्य सरकारांना असल्याचे स्पष्ट केले होते. याअंतर्गत शाळा, महाविद्यालये कधी सुरू करायची याचा निर्णय राज्य सरकारे घेऊ शकणार आहेत.
महाराष्ट्र -
गेल्या २४ तासात राज्यातील १४४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीस खात्यातील बाधितांची संख्या २४ हजार २३ वर पोहोचली आहे.
पंजाब -
चंदीगढ - कोरोना संकटकाळात पुढे राहून लढणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्याचा निर्णय पंजाब खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज बोर्डाने (PKVIB) घेतला आहे. बोर्डाचे अध्यक्ष ममता दत्ता ही घोषणा केली आहे.
केरळ -
कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे राज्यात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे एकावेळी एकाचठिकाणी ५हून जास्त लोक गोळा होऊ शकणार नाहीत. ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत हा नियम लागू राहणार आहे.
ओडिशा -
बिजू जनता दलाचे आमदार प्रदीप महारथी यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. पुरी जिल्ह्यातील पिपली येथून ते ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पत्नी प्रतिवा, मुलगा रुद्रप्रताप आणि मुलगी पल्लवी असा आप्त परिवार आहे. १४ सप्टेंबरला महारथी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, प्रकृती खाल्यावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले होते.