ETV Bharat / bharat

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

जागतिक पातळीवर भारतात रिकव्हरी दर २१ टक्के आहे, तर कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताची जागतिक पातळीवरील भागीदारी १८.६ टक्के आहे. अमरिकेत सर्वाधिक रुग्ण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून अमेरिकेचा रिकव्हरी दर १८.४ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जारी केली आहे.

author img

By

Published : Oct 4, 2020, 2:34 AM IST

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हैदराबाद - जागतिक पातळीवर कोरोना रुग्णसंख्येबाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असताना आता एका सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक भारतात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जागतिक पातळीवर भारतात रिकव्हरी दर २१ टक्के आहे, तर कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताची जागतिक पातळीवरील भागीदारी १८.६ टक्के आहे. अमरिकेत सर्वाधिक रुग्ण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून अमेरिकेचा रिकव्हरी दर १८.४ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जारी केली आहे.

महाराष्ट्र -

शनिवारी मुंबईतील धारावी भागात १२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या ८ दिवसांपासून धारावीत दहापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. धारावीत ३ हजार २१७ रुग्णांची नोंद झाली असून यापैकी १६४ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत २ हजार ७६२ रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्ली -

दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांचा दर कमी झाला असून तो ५.१९ टक्क्यांवर आला असल्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. शुक्रवारी आम्ही ५६ हजार २५८ सॅम्पलची चाचणी केली. यापैकी केवळ २ हजार ९२० लोक बाधित असल्याचे आढळून आले, असेही जैन यांनी सांगितले. खासगी आणि शासकीय रुग्णालयातील बेड्सची संख्याही आम्ही वाढवत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

झारखंड -

रांची - झारखंडचे अल्पसंख्याकमंत्री हाजी हुसैन अन्सारी यांचे येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जेएमएमचे नेते अन्सारी यांना मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते की, अन्सारी हे कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. याचा अर्थ ते रिकव्हर झाले होते.

केरळ -

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३१ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होईल. याअंतर्गत ५ पेक्षा अधिक लोक एकाठिकाणी गोळा होऊ शकणार नाहीत. दरम्यान, राज्यात ४ हजार ४७६ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून आतापर्यंत ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.