ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोना संबंधीच्या घडामोडी....वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना बातमी

देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. तर मागील २४ तासांत ६९ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ७ हजार ६६८ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून २२ लाख ८० हजार ५६७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशात ५६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त २१ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 24, 2020, 5:29 AM IST

हैदराबाद - देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर केला होता, या घटनेला १५३ दिवस झाले आहेत. दरम्यान, कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्यासाठी भारतातील सीरम इन्स्टिट्युट या कंपनीने अ‌ॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर हात मिळवणी केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याची आणि UGC-NET, CLAT, NEET आणि JEE च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

परीक्षा करण्यासाठी आणि पुढे ढकलण्यासाठी चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे उपोषण करत आंदोलन केले. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. तर मागील २४ तासांत ६९ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ७ हजार ६६८ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून २२ लाख ८० हजार ५६७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशात ५६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त २१ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल तामिळनाडू राज्यात ६ हजार ३४० जण दगावले आहेत. कर्नाटकात ४ हजार ५२२ तर दिल्लीत ४ हजार २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली -

जनतेच्या सहकार्यामुळे राजधानी दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने आंनद होत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी म्हणाले. दिल्ली ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहे, त्याची संपूर्ण देशात आणि जगात चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

मात्र, राजधानी दिल्लीतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.

जुन महिन्यात दिल्लीत संसर्गाचे प्रमाण ३५ टक्क्यांवर होते. ते आता ७ टक्क्यांवर आले आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. तरीही जुनपेक्षा ऑगस्ट महिन्यात मृतांची संख्या कमी असल्याचे जैन म्हणाले.

तेलंगणा -

तेलंगणा राज्यात मागील २४ तासांत २ हजार ३८४ नवे रुग्ण आढळून आले. तर ११ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या राज्यात २२ हजार ९०८ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर एकूण ७५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेश -

मध्यप्रदेशचे आरोग्य मंत्री प्रभूराम चौधरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी ट्विट करून त्यांनी याबाबत माहिती दिली. आत्तापर्यंत राज्यातील सात मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही लागण झाली होती. मात्र. ते आता बरे झाले आहेत. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

झारखंड -

झारखंड राज्याचे कृषी मंत्री बादल पत्रलेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी ट्विट करुन त्यांनी माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ओडिशा -

ओडिशा राज्यात रविवारी २ हजार १२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.