ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोना संबंधीच्या घडामोडी.....वाचा एका क्लिकवर - India corona update

पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना काल (मंगळवार) केले. देशात आत्तापर्यंत २७ लाख ६ हजार ४५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ५१ हजार ७९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

COVID INDIA
देशातील कोरोनाची स्थिती
author img

By

Published : Aug 19, 2020, 4:01 AM IST

हैदराबाद - भारतात लॉकडाऊन सुरु केल्यापासून आज १४८ वा दिवस आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हळूहळू यात सुट देण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना काल (मंगळवार) केले. देशात आत्तापर्यंत २७ लाख ६ हजार ४५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ५१ हजार ७९७ जणांचा मृत्यू झाला.

COVID INDIA
देशातील कोरोनाची स्थिती

दिल्ली

काल राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत दिल्ली पोलीस विभागातील १६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पासून बरे झालेले रुग्ण पुन्हा लक्षणे आढळल्याने रुग्णालयात येत असल्याचे दिल्लीतील काही रुग्णालयांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात आता ६ लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दक्षिण आफ्रिका देशापेक्षाही जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. दक्षिण आफ्रिकेत ५ लाख ८९ हजार ८८६ रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ११९ नवीन रुग्णांची नोंद झाले असून, ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बिहार

राज्यात २९ हजार ३८७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकट्या पटना शहरात मागील २४ तासांत ३६८ बाधित सापडले. तर १६ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे.

कर्नाटक

बायोकॉन कंपनीच्या प्रमुख किरण शॉ मुजूमदार यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात ८० हजारापेक्षा जास्त अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरु शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे.

उत्तर प्रदेश

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला २ दिवस बाकी असताना विधिमंडळातील २४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. राज्यात मागील २४ तासांत ४ हजार ३३६ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ७७ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या १ लाखांच्याही पुढे गेली आहे.

ओडिशा -

राज्यात १८ हजारांपेक्षा जास्त अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांत सुमारे ७०० रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत राज्यात ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. ४३ हजार रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.