ETV Bharat / bharat

चिंताजनक : देशात मागील 24 तासात 39 हजार कोरोनाबाधित रुग्णांची वाढ...

आतापर्यंत देशात एकूण 26 हजार 816 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील चार दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

corona
देशातील कोरोनाचा आढावा...
author img

By

Published : Jul 20, 2020, 2:33 AM IST

हैदराबाद - सध्या देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार हा व्हायरस झपाट्याने आपले हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासात देशात 38 हजार 900 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 10 लाख 77 हजार 618 इतका आहे. आतापर्यंत देशात एकूण 26 हजार 816 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील चार दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

corona
देशातील कोरोनाचा आढावा...
  • महाराष्ट्र

राज्यात रविवारी कोरोनाच्या ९,५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. एका दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची ही सर्वोच्च आकडेवारी ठरली. तसेच, गेल्या 24 तासात राज्यात 258 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले असून, रविवारी ३,९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून, आतापर्यत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

  • नवी दिल्ली

गेल्या 24 तासात दिल्लीत 31 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी, दिल्लीमध्ये कोरोनाचे १,१११ नवीन रुग्ण आढळले असून, हे मागील एका महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. राजधानी दिल्ली आतापर्यंत कोरोना विषाणूचे एकूण रुग्णसंख्या 1,22,793 वर पोहोचली आहे. दिल्लीत कोरोना मृतांचा आकडा 3,628 वर पोहोचला आहे.

  • बिहार

कोरोनाच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी रविवारी आरोग्य मंत्रालयातील तीन सदस्यीय पथकाने बिहारला भेट दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव के लव्ह अग्रवाल यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांच्या चमूने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांसह उच्च आरोग्य अधिकाऱयांसमवेत कोरोना परिस्थितीच्या विविध बाबींविषयी चर्चा केली. तसेच राज्यातील आरोग्य अधिकाऱयांना आवश्यक मदत व मार्गदर्शन केले.

  • हिमाचल प्रदेश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भाजी व किरकोळ दुकांनाना आपली दुकाने नियम व अटींसह सुरू ठेवण्याचे आदेश शिमला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासाठी प्रशासनाने सर्वांना ओळखपत्र दिले आहेत.

  • उत्तराखंड

डेहराडूनमध्ये 110 पेक्षा जास्ती भारतीय जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी यासंदर्भातली माहिती दिली.

  • आसाम

राज्यात रविवारी 1,018 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून, यातील 577 रुग्ण हे गुवाहाटीमधील आहेत. राज्यात आतापर्यंत 23,999 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 16,023 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 7,916 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 57 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

  • झारखंड

राज्यात रविवारी 153 नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 5552 कोरोना रुग्ण राज्यात आहेत.

  • तेलंगाणा

तेलंगाणात रविवारी 1296 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 45, 076 कोरोनाबाधित आहेत. यातील 32, 438 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 12, 224 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण 415 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.