ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 25 हजार 282 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 इतकी आहे. देशात सोमवारी 13 हजार 699 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 2,37,195 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

COVID-19 news from across the nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 23, 2020, 3:23 AM IST

Updated : Jun 23, 2020, 7:19 AM IST

हैदराबाद - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 25 हजार 282 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 इतकी आहे. देशात सोमवारी 13 हजार 699 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 2,37,195 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

COVID-19 news from across the nation
कोरोनाची देशातील सद्यस्थिती.

दिल्ली - राज्य सरकार शहरात गृह विलगीकरणात असलेल्यांना पल्स ऑक्सिमीटर देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केली. तसेच येथे घेण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये तीन पट वाढ झाली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

एका दिवसाला 18 हजार कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. सध्या 12 हजार लोक गृह विलगीकरणात आहेत. त्यांना आम आदमी पक्षाकडून पल्स ऑक्सिमीटर देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र -

मुंबई - मागील 24 तासांत 55 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या एकूण 4 हजार 103 वर पोहोचली आहे. तर राज्यात 48 कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्य राखीव दलातील पहिल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 21 जूनला मृत्यू झाला. हा कर्मचारी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे तैनात होता.

केंद्रिय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनाबाधित असेलेले राज्य आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे. तर 6 हजार 170 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात -

मागील 10 दिवसांत सुरतमध्ये हिरे व्यापारातील जवळपास 300 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. या अनुषंगाने येथील व्यापारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

याचाच एक भाग म्हणून, तीन मुख्य हिरे बाजारपेठा आठवड्यातून दोनदा बंद ठेवण्यात येणार आहे. तर हिरे पॉलिशिंग युनिट्सचे कॅन्टीन सर्व दिवस बंद राहतील.

कर्नाटक -

बंगळूरूत गेल्या काही दिवसांत 322 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बृहत बंगळूरू महानगरपालिकाने (बीबीएमपी) सोमवारी 142 नवीन कंटेनमेंट झोन 'सक्रिय' म्हणून नोंद केली आहे.

बीबीएमपी कोवीड-19 वार रूमने जाहीर केल्यानुसार, सोमवारपर्यंत शहरात एकूण 440 कंटेंनमेंट झोन कार्यरत आहेत. तसेच 22 जूनपर्यंत शहरात 919 अक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

राजस्थान -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यात मृतांची संख्याही सतत वाढत आहे. बिकानेर येथील पीबीएम रूग्णालयात सोमवारी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. एल. मीना यांनी दिली.

मध्यप्रदेश -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता रेल्वेने भोपाल रेल्वे स्थानकावर मॉडर्न मशिन बसविण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाने विना मास्क रेल्वे स्थानकावर प्रवेश केल्यानंतर या मशिनच्या माध्यमातून अलार्म वाजणार आहे. रेल्वे स्थानकावर थर्मला इमॅजिंग कॅमेराही बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यामातून प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येत आहे.

राज्याचा मृत्यूदर गुजरात (6.10%), महाराष्ट्र (4.67%) नंतर 4.32 टक्क्यासह देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बिहार -

एका भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना पटना येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

जिबेश कुमार मिश्रा असे या आमदाराचे नाव आहे. ते दरभंगातील जले मतदासंघाचे प्रतिनिधित्व करतात. सुरूवातीला त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळले होती. यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ते द्विसदनीय विधानसभेचे पहिले आमदार आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

झारखंड -

संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देवघर येथील श्रावणी यात्रेबाबत शंका निर्माण होत आहे. मंदिराचे दरवाजे अजूनही बंद आहेत. तसेच अनेक पुरोहित संघटनांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे ही यात्रा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

तर तेच दुसरीकडे गोद्दाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे. ते ईटीव्ही भारतसोबत बोलताना ते म्हणाले, जर बाबाधाम मंदिराचे दरवाजे उघडले नाही तर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले. हा विषय फक्त श्रद्धेपुरताच मर्यादित नाही तर लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्व आहे.

छत्तीसगड -

राजनंदगाव येथील काँग्रेस आमदार दलेश्वर साहू यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेत आहे.

आमदार साहू यांनी एका व्यक्तिच्या घरी भेट दिली होती. तो डोंगरगाव येथे मृत्यू झाला होता. मृताचा नातेवाईक आणि अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या एका तरूण नंतर कोरोनाबाधित आढळले होते. हे, संसर्गाचे कारण असू शकते, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 23, 2020, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.