हैदराबाद - भारतात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यूदर जगभरात सर्वात कमी आहे. मात्र, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख पार झाला आहे. कोरोनामुळे देशभरात मागील 24 तासांत 467 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या 20 हजार 160 इतकी झाली आहे.
- महाराष्ट्र
मंगळवारी (दि. 7 जुलै) कोरोनाच्या 5 हजार 134 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात 89 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 नमुने पॉझिटिव्ह (18.69 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.राज्यात आज 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने दिलासा मिळाला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 54 टक्क्यांवर कायम असून, मंगळवारी 3 हजरा 296 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 18 हजार 558 झाली आहे.
- दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कोविड-19 वॉर रूम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. जी 24x7 कोरोना विरोधातील सर्व हालचालीवर लक्ष ठेऊन असणार आहे. या कोविड-19 वॉर रूममध्ये 25 जण काम करणार आहेत.
- मध्य प्रदेश
भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्वीय सहायक अनिल मिश्रा यांना कोरोना झाला आहे. ते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याही संपर्कात आले आहेत. याव्यतिरिक्त इंदूरच्या हाटोद परिसरात एकाच कुटुंबियांतील 27 जणांना कोरोना झाला आहे. आरोग्य विभागाने हा परिसर सील केला आहे.
- बिहार
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या पुतणीला कोरोना झाला आहे. नीतीश कुमार यांनी 4 जुलैला स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालयातील सहा डॉक्टर, तीन परिचारिका आणि एक वेंटिलेटर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विधान परिषद भवन 10 जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहे.
- ओडिशा
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यात मागील 24 तासांमध्ये 571 नवे कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 10 हजाराच्या पार गेला आहे. राज्यात चार जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा 42 वर पोहोचला आहे. तर 219 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
- झारखंड
झारखंडच्या धनबादमधील एका कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये अळ्या निघाल्या. यानंतर येथील रुग्णांनी उपोषण करण्याचा इशारा दिला.
- पंजाब
पंजाबमध्ये मंगळवारी कोरोनाचे 258 नवे रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 6 हजार 749 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकुण संख्या 175 झाली आहे.
- हरियाणा
पंडित भगवत दयाल शर्मा पोस्ट-ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (PGIMS), रोहतक येथे कोविड वैक्सीनची मानवी चाचणी शुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर हैदराबादमधील भारत बायोटेकला याचा अहवाल पाठविला आहे.
- उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये साठहून अधिक कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तसेच राज्यात कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 3 हजार 230 वर पोहोचला आहे. यापैकी 538 अॅक्टिव रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर 81.81 टक्के इतका आहे.
- गुजरात
राज्यात सतत कोरोनाग्रस्ताचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
हेही वाचा - 'कोविड-१९'चा मानवी अधिकारांवर काय परिणाम? मानवाधिकार आयोग करणार अभ्यास..