COVID-19 LIVE :
- इटलीमधील भारतीयांची पुढील बॅच आठवड्याअखेरपर्यंत येणार परत..
नवी दिल्ली - इटलीमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांची पुढची बॅच लवकरच मायदेशी परतणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याअखेरपर्यंत त्या नागरिकांना परत आणण्यात येणार आहे.
-
Next batch of Indians stranded in #coronavirus-hit Italy expected to be evacuated over weekend: Ministry of External Affairs
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Next batch of Indians stranded in #coronavirus-hit Italy expected to be evacuated over weekend: Ministry of External Affairs
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020Next batch of Indians stranded in #coronavirus-hit Italy expected to be evacuated over weekend: Ministry of External Affairs
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
- मध्य प्रदेशमधील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्प बंद..
भोपाळ - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून मध्य प्रदेशमधील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्प लोकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
-
Madhya Pradesh govt announces closure of all national parks, sanctuaries and tiger reserves. #COVID19 #coronavirus
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Madhya Pradesh govt announces closure of all national parks, sanctuaries and tiger reserves. #COVID19 #coronavirus
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020Madhya Pradesh govt announces closure of all national parks, sanctuaries and tiger reserves. #COVID19 #coronavirus
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
- गुजरातमध्ये आढळला आणखी एक रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या ३ वर..
गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३वर पोहोचली आहे.
- उत्तराखंडमध्ये आढळले आणखी दोन रुग्ण, दोघेही ट्रेनी आयएफएस अधिकारी..
देहराडून - उत्तराखंडमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोनही रुग्ण राज्याची राजधानी असणाऱ्या देहराडूनमध्ये मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही ट्रेनी आयएफएस आहेत. हे दोघेही स्पेनमधील आपल्या अभ्यास दौऱ्याहून मायदेशी परतले होते.
- देशातील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्नशील..
नवी दिल्ली - देशातील नागरिकांना दुध, औषधे, खाण्या-पिण्याचे सामान आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुले लोकांनी साठेबाजीसारखे प्रकार करू नयेत, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.
- अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांचे आभार माना..
नवी दिल्ली - या आणीबाणीच्या काळात, तुम्हाला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मेहनत घेत आपला जीव धोक्यात टाकत असणाऱ्या लोकांचे देशातील नागरिकांनी आभार मानायला हवेत. त्यासाठी दर रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्व नागरिकांनी आपापल्या दरवाजांमध्ये, खिडक्यांमध्ये उभे राहून टाळ्या, थाळ्या अन् घंटा वाजवून या सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानावेत, असे आवाहन मोदींनी केले.
- कोव्हिड-१९ इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स..
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी, अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'कोव्हिड-१९ इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स'ची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ही टास्क फोर्स देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींना कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल.
- रविवारी देशात लागू करा 'जनता कर्फ्यू', पंतप्रधानांचे आवाहन..
नवी दिल्ली - कोरोना विषाणूसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करत आहेत. कोरोनाला लढा देण्यासाठी, रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेने स्वतःवर कर्फ्यू लावून घ्यावा. यादरम्यान लोकांनी स्वेच्छेने घराबाहेर पडणे टाळावे, आणि एक 'जनता कर्फ्यू' पाळावा, असे आवाहन पंतप्रधानांनी लोकांना केले आहे. तसेच शक्य झाल्यास इतरांनाही या जनता कर्फ्यूबाबत सांगावे, असेही ते म्हटले आहेत.
- कोरोनाचा सामना करण्यासाठी दोनच गोष्टी आवश्यक, संकल्प आणि संयम..
नवी दिल्ली - कोरोना विषाणूसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन गोष्टी आवश्यक आहेत. आपण स्वतःला संसर्ग होऊन देणार नाही, असा संकल्प देशातील नागरिकांनी केला पाहिजे, असे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले.
- गुजरातमध्ये आढळले कोरोनाचे दोन रुग्ण..
गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी एक रुग्ण सूरत, आणि दुसरा राजकोटमध्ये आढळून आला आहे. यांपैकी राजकोटचा रुग्ण हा मक्का-मदिना यात्रेहून परत आल्याची माहिती समोर आली आहे.
- कर्नाटकातील दोघांवर उपचार यशस्वी, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती..
बंगळुरू - कर्नाटकातील दोन कोरोनाग्रस्तांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून, विषाणूचा झालेला प्रादुर्भावही नाहीसा झाला आहे. त्यामुळे या दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. डेल कंपनीच्या एका कर्मचाऱ्याची पत्नी, आणि गुगलचा एक कर्मचारी हे दोघे या बरे झाले आहेत. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. राज्यात आतापर्यंत एकूण १५ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
- सिंगापूरमधील ९०हून अधिक भारतीय परतणार मायदेशी..
सिंगापूर - भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सिंगापूरमध्ये अडकलेल्या भारतीयांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंगापूरमधील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली आहे.
-
Indian High Commission in Singapore: Over 90 Indian transit passengers stranded in Singapore due to travel restrictions in India are on their way home.
— ANI (@ANI) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Quick response from Indian Government to permit them to return; High Commission officers at airport to assist them #coronavirus pic.twitter.com/t0cfBVTHID
">Indian High Commission in Singapore: Over 90 Indian transit passengers stranded in Singapore due to travel restrictions in India are on their way home.
— ANI (@ANI) March 19, 2020
Quick response from Indian Government to permit them to return; High Commission officers at airport to assist them #coronavirus pic.twitter.com/t0cfBVTHIDIndian High Commission in Singapore: Over 90 Indian transit passengers stranded in Singapore due to travel restrictions in India are on their way home.
— ANI (@ANI) March 19, 2020
Quick response from Indian Government to permit them to return; High Commission officers at airport to assist them #coronavirus pic.twitter.com/t0cfBVTHID
- केरळमध्ये आढळला नवा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या २८ वर..
तिरुवअनंतपूरम - केरळमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या कासारगोड जिल्ह्यात हा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण दुबईहून परतला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.
- कोरोनामुळे एका भारतीयाचा इराणमध्ये मृत्यू..
तेहरान - इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
-
One Indian who tested positive for coronavirus has died in Iran: Ministry of External Affairs official
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">One Indian who tested positive for coronavirus has died in Iran: Ministry of External Affairs official
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020One Indian who tested positive for coronavirus has died in Iran: Ministry of External Affairs official
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
- रोममधील भारतीयांना परत आणण्यासाठी २१ मार्चला पाठवणार विमान..
नवी दिल्ली - रोममध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी २१ मार्चला विमान पाठवण्यात येणार आहे. एअर इंडियाचे ७८७-ड्रीमलाईनर हे विमान या भारतीयांना परत आणेल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्रवक्त्या रुबीना अली यांनी दिली आहे.
- कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने घेतले विविध निर्णय..
नवी दिल्ली - कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध निर्णय घेतले आहे. देशातील लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी वगळता, इतर ६५ वर्षांवरील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. याबाबत योग्य त्या सूचना आपापल्या राज्यांमध्ये द्याव्यात असे केंद्राने राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत. तसेच, दहा वर्षांखालील मुलांनाही घरात राहण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
यासोबतच खासगी क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा द्यावी, यासाठी केंद्राने राज्य सरकारांना विनंती केली आहे. याला आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा अपवाद राहणार आहे.
तसेच विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग व्यक्ती वगळता अन्य लोकांसाठी असलेल्या सवलती रद्द करण्याचे आदेश सरकारने रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक विभागाला दिले आहेत.
- देशामध्ये उतरणार नाहीत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमाने, सरकारचा निर्णय..
नवी दिल्ली - देशामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांना उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. २२ मार्च ते २९ मार्चपर्यंत ही बंदी लागू असणार आहे.
- जम्मू काश्मीरमध्ये आढळला नवा रुग्ण, प्रांतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या चार..
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळला असून, प्रांतातील एकूण रुग्णांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने २,३३७ नागरिकांना घरामध्ये राहण्यास सांगितले आहे. तर, ३४ नागरिकांना रुग्णालयात वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे.
- जगभरात कोरोनाचे नऊ हजारांहून अधिक बळी, बरे झालेल्यांची संख्या ८५ हजार..
जगभरातील कोरोनाच्या बळींनी ९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या जगात कोरोनाचे २,२५,२५३ रुग्ण असून, ९,२७६ लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, यातून बरे झालेल्यांची संख्या ८५,८२६ आहे.
- स्पेनमधील बळींची संख्या ७६७ वर..
मद्रीद - स्पेनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या बळींमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. देशातील एकूण बळींची संख्या ७६७वर पोहोचली आहे.
- दुकाने सुरू ठेवल्यामुळे पुण्यातील १६ दुकानदारांवर गुन्हा दाखल..
पुणे - जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांना झुगारून, दुकाने सुरू ठेवल्याबद्दल पुण्यातील १६ दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती निवारण कायदा २००५, आणि महामारी कायदा १८६७ नुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
- रायपूरमध्ये आणि राज्यातील सर्व महानगरपालिका परिसरात कलम १४४ लागू..
रायपूर - छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये, तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या परिसरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही माहिती दिली.
- कर्नाटकात आढळला आणखी एक रुग्ण, कोडागू जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू..
बंगळुरू - कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण सौदी अरेबियामधून परतल्याची माहिती मिळत आहे. यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १५वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी दिली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोडागू जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉज आणि रिसॉर्ट बंद राहणार असल्याचे जिल्ह्याच्या उपायुक्तांनी स्पष्ट केले.
- पंजाबमध्ये कोरोनाचा पहिला बळी, पठनाला गावाला केले सील..
चंदीगड - पंजाबच्या पठनाला गावात कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठनाला गावाला या पार्श्वभूमीवर सील करण्यात आले आहे.
- छत्तीसगडमध्ये बाहेरील राज्यातून येणाऱ्या गाड्यांना बंदी, राज्य सरकारचा निर्णय..
रायपूर - छत्तीसगड वगळता अन्य राज्य परिवाहनाच्या गाड्यांना राज्यात येण्यास छत्तीसगड सरकारने मनाई केली आहे. यासोबतच, ऑल इंडिया परमिटच्या गाड्यांनाही राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुंबई - देशभरामध्ये कोरोनाचे १८० रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ राज्यात सापडले आहेत. इतर राज्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या ४.०० वाजता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहे. या बैठकीला राज्यांचे आरोग्य मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
वाचा : कोरोना : पंतप्रधान मोदी साधणार सर्व राज्यांच्या मुख्यंमत्र्यांशी संवाद
- नोएडामध्ये 'एचसीएल' कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह..
नवी दिल्ली - एचसीएलच्या नोएडामधील कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
- सक्तीचे विलगीकरण न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, राज्याच्या गृहमंत्र्यांचे आदेश..
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना सक्तीने विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे, असे लोक बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला याबाबत आदेश दिले आहेत.
- कोरोनाचा विमान वाहतुकीला फटका; इंडिगो कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात..
नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमान वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. इंडिगो या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष आणि त्यावरील हुद्द्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के, तर उपाध्यक्ष आणि कॉकपिट क्रू यांच्या वेतनात १५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तसेच, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता यांच्या पगारातही २५ टक्के कपात करण्यात आली आहे.
- कोल्हापूर - कोरोना विषाणूची भीती आता संपूर्ण राज्यात पसरली आहे. गुजरीमध्ये गाडीवरून जाताना शिंकल्यामुळे एकाला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
वाचा : VIDEO : कोरोनाचा धसका, कोल्हापूरात बाजूने जाताना शिंकल्यामुळे एकाला बेदम मारहाण
- मुंबई - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोव्हिड १९ म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत वातानुकुलित यंत्रणांचा वापर कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
वाचा : एसीचा वापर टाळा, राज्य सरकारचे तातडीचे परिपत्रक
- यूजीसीच्या सर्व परीक्षा ढकलल्या पुढे..
नवी दिल्ली - युनिवर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी)ने आपल्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यूजीसीच्या सर्व परीक्षा आता ३१ मार्च नंतर होतील. तसेच, मूल्यांकनाचे कामही ३१ मार्चनंतरच होणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.
- मुंबईमधील हाजीअली दर्गा बंद..
मुंबई - शहरातील प्रसिद्ध हाजीअली दर्गा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
- राज्यातील रुग्णांची संख्या ४९ वर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या १२ तासांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सातने वाढली आहे.
- 'मुंबईचा डबेवाला'ही सुट्टीवर; ३१ मार्चपर्यंत सेवा स्थगित..
मुंबई - मुंबईच्या डबेवाल्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत ते सुट्टीवर असणार आहेत.
- नवी दिल्ली - कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आयसीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी आर्थोन यांनी ३१ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. देशातील कोरोनाचा प्रभाव पाहून नव्याने तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
वाचा : कोरोनाच्या फैलावामुळे आयसीएसईने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- सिंगापूरमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपण सिंगापूरमधील दूतावासाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असताना भारतीय चलनाच्या आर्थिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रुपयाची सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य ७४.९६ झाले आहे.
वाचा : कोरोनाने रुपयाच्या 'आर्थिक' आरोग्यावर परिणाम; डॉ़लरच्या तुलनेत ७० पैशांनी घसरण
- नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे १६९ रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे देशभरातीतल जनजीवन विस्कळीत झाले आहे. कमी प्रवासी संख्येमुळे रेल्वे विभागाने देशभरातील तब्बल १६८ गाड्या रद्द केल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. मात्र, आता कोरोनाच्या भीतामुळे प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकिटे रद्द करण्यास सुरूवात केली आहे.
वाचा : कोरोनाच्या भीतीने रेल्वेला लागला ब्रेक; देशभरातील १६८ गाड्या रद्द
- मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांची राज्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी २ कोरोनाबाधित महिला आढळल्या आहेत. मुंबईमध्ये एका २२ वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे आढळले आहे. ती महिला नुकतीच इंग्लडहून भारतात आली होती. तर दुसरी कोरोनाबाधित महिला उल्हासनगरमध्ये आढळली असून, ती दुबईहून भारतात आली होती. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा आकडा ४७ वर पोहोचला आहे.
वाचा : राज्यात आणखी २ कोरोनाग्रस्त आढळले, एकूण आकडा ४७ वर
- देशातील रुग्णांची संख्या १६८, सरकारची माहिती..
नवी दिल्ली - गुरूवार १९ मार्च, सकाळी दहा वाजेपर्यंत देशात १६८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे.
जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधील याचा प्रसार आता जवळपास आटोक्यात आला असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि इतर काही देशांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे दोन लाख वीस हजार लोकांना याची लागण झाली असून, सुमारे नऊ हजार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच, साधारणपणे ८५ हजार लोक यातून बरे झाले आहेत.
भारतात आतापर्यंत सुमारे १७५ जणांना याची लागण झाली असून, तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणपणे १५ लोक बरेही झाले आहेत.