नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे तब्बल १,२११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या दहा हजारांहून अधिक (१०,३६३) झाली आहे.
यामध्ये ८,९८८ अॅक्टिव रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १,०३५ रुग्णांवरती यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३३९ वर पोहोचली आहे.
-
COVID19: 1211 new cases and 31 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/14s5nm2oW2
— ANI (@ANI) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">COVID19: 1211 new cases and 31 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/14s5nm2oW2
— ANI (@ANI) April 14, 2020COVID19: 1211 new cases and 31 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/14s5nm2oW2
— ANI (@ANI) April 14, 2020
महाराष्ट्रात सर्वाधिक (२,३३४) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,५१०) आणि तामिळनाडूचा (१,१७३) क्रमांक लागतो. तर, महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१६०) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (४३) आणि गुजरातचा (२८) क्रमांक लागतो.
हेही वाचा : कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना सोनिया गांधींनी संबोधले 'देशभक्त'