ETV Bharat / bharat

COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 65 हजार 799 झाला आहे, यात 89 हजार 987 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 71 हजार 105 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 4 हजार 706 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : May 29, 2020, 3:31 PM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ असून होत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये 7 हजार 466 कोरोनाबाधित आढळले असून 175 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 65 हजार 799 झाला आहे, यात 89 हजार 987 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 71 हजार 105 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 4 हजार 706 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारत एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख कोरोना चाचण्या करत आहे. या चाचण्या 612 प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत. यामध्ये 430 सार्वजनिक तर 182 खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच जगाच्या तुलनेत भारताचे मृत्यूचे प्रमाण कमी असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे.

दरम्यान जगभरात कोरोनाचा प्रसार पाहता, 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 59 लाख 5 हजार 415 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 62 हजार 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 25 लाख 79 हजार 611 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.