नवी दिल्ली - देशात आजअखेर कोरोनाच्या १०,३६३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३३९वर पोहोचली आहे. पाहूयात देशभरातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी..
देशातील तीन राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (२,३३४) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,५१०) आणि तामिळनाडूचा (१,१७३) क्रमांक लागतो. तसेच, पाच राज्यांमध्ये ५००हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यांमध्ये राजस्थान (८७३), मध्य प्रदेश (६०४), गुजरात (५३९), तेलंगाणा (५६२), आणि उत्तर प्रदेशचा (५५८) क्रमांक लागतो.
महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१६०) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (४३), दिल्ली (२८), आणि गुजरातचा (२६) क्रमांक लागतो. तर, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी ११ बळींची नोंद झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी ८,९८८ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत १,०३५ लोकांवरतील यशस्वी उपचार झाले आहेत.
हेही वाचा : देशातील लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची घोषणा..