नवी दिल्ली - देशभरात गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३५४ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी ३,९८१ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ३२५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ५ नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा ११४ वर पोहोचला आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (८६८) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (६२१) आणि दिल्लीचा (५२३) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (५२) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१२) आणि मध्य प्रदेशचा (९) क्रमांक लागतो.
हेही वाचा : १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..