भोपाळ - सोशल डिस्टंसिंग आणि विगलीकरणाच्या नावाखाली मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील गुना जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत दाम्पत्याला चक्क शौचालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे सर्व सामानही शौचालयात ठेवण्यात आले होते, एवढेच नाही तर त्यांना शौचालयातच जेवण दिले जात होते.
राजगढ जिल्ह्यातून काही स्थलांतरीत मजूर गुना जिल्ह्याील राघौगड तहसिलमधील देविपुरा गावात आले आहेत. माघारी आलेल्या मजूरांना गावकऱ्यांनी स्थानिक शालेमध्ये क्वारंटाईन केले आहे. मात्र, बाहेरून आलेल्या या दांम्पत्याला कोरोनाच्या भीतीमुळे शौचालयात राहण्याची वेळ आली. स्थानिक सरपंच आणि सचिवाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर ही वेळ आली.
या मानहाणीकारण प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. कोरोनाच्या भीतीपोटी दाम्पंत्याला शौचालयात रहावे लागले. आता याप्रकरणी विभागीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधीही मुळगावी परतणाऱ्या स्थलांतरीत मजूरांना हीन वागणूक दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. दिल्लीवरून उत्तरप्रदेशात माघारी परतलेल्या नागरिकांना अग्निशामक दलाने केमिकलने अंघोळ घातली होती. या प्रकरणी प्रशासनाने दखल घेत कारवाई केली होती.