ETV Bharat / bharat

'कोरोना संकटकाळात बाळाच्या संरक्षणाकरता आईचे दूधच सर्वोत्कृष्ट' - जागतिक आरोग्य संघटना बातमी

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी कोरोना संसर्ग झाल्याच्या परिस्थितीतही स्तनदा मातांना बाळांना दूध पाजता येते असे सांगितले आहे. मात्र, याबाबत संशोधकांचे कार्य सुरू असून मातेच्या दूधातून कोरोनाच्या प्रसरणाची शंका फारच कमी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आईचे दूधच सर्वोत्कृष्ट
आईचे दूधच सर्वोत्कृष्ट
author img

By

Published : May 28, 2020, 3:31 PM IST

हैदराबाद - जागतिक आरोग्य संगठन, युनिसेफ इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क (आयबीएफएएन) या संस्थेच्या रिपोर्टनुसार, बाळाला देण्यात येणाऱ्या मातेच्या दूधाचा पर्याय शोधण्याकरता अनेक जाहिराती करण्यात येतात. खूप साऱ्या देशांमध्ये सुरू असलेल्या अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरू असून अशा प्रकारची भ्रामकता पसरवणाऱ्या जाहिरातींना आटोक्यात आणण्याकरता त्या देशांचे प्रयत्न कमी पडत असल्याचे या रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या स्तनदा मातांच्या दूधामुळे लहान मुलांना संसर्ग होत नसल्याचे या रिपोर्टसमुळे समोर आले आहे. सोबतच, मातेचे दूध हे तिच्या बाळासाठी आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे, कोरोनाची शक्यता असलेली महिला अथवा बाधित महिलेच्या दुधामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे, कुठलीही भ्रामकता न ठेवता मातेने तिच्या बाळाला दूध पाजायला हवे. विषेश म्हणजे, मातेच्या दूधामुळे बाळाला कोरोना किंवा त्यासारख्या आजारांपासून दूर ठेवण्याचे प्रमाण तसेच त्याची प्रतिकार शक्ती वाढण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे, बाळाला वरचे कुठलेही दूध देण्यापेक्षा मातेचे दूधच देण्याचे या रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार जगभरातील १९४ देशांमध्ये करण्यात आलेल्या संशेधनांतर्गत १३६ देशांमध्ये स्तनपानाच्या पर्यायाकरता किंवा स्तनपानाव्यतिरिक्त दूसऱ्या पर्यायांकरता इंटरनॅशनल कोड ऑफ मार्केटिंगनुसार कायदेशीर उपाययोजना करण्यात आली आहे. त्यानंतर, जागतिक आरोग्य असेंब्लीने (कोड) या ठरावाला स्वीकृती दिली आहे.

गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास ४४ देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकृत केलेल्या ठरावाला मान्यता दिली. फक्त ७९ देशांमध्ये स्तनपानच्या पर्यायी जाहिरातींना पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आल्या आहेत. तर, ५१ देशांमध्ये, मातेच्या दूधाला पर्यायी असलेलया कमी दर्जेच्या किंवा मोफत मिळणाऱ्या उत्पादनांच्या वितरणावर प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ १९ देशांमध्ये मातेच्या दुधाला पर्यायी उत्पादन तयार करणाऱ्या कंपनींवर डॉक्टर किंवा संशोधकांना स्पॉन्सर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या न्यूट्रिशन अ‌ॅन्ड फूड सेफ्टी विभागाचे संचालक डॉ. फ्रान्सिस्को ब्रांका म्हणतात, स्नपानाच्या पर्यायाकरता वापरण्यात येणाऱ्या पर्यायी उत्पादन कंपन्या या विषयाशी निगडीत डॉक्टर किंवा संशोधकांचा वापर करताहेत. त्यामुळेच, आम्हाला या पर्यायी उत्पादनांवरील मार्केटिंगवर प्रतिबंध आणण्यास अडचणी येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक देशातील आरोग्य विभागाने या विषयावर लक्ष घालून पालकांच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजे. जेणेकरून ते बाळांना पर्यायी उत्पादनांऐवजी मातेच्या दूध देण्याकडे जोर देतील. सोबतच, बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यात बाळाला फक्त आणि फक्त मातेचे दूध देण्यात यावे. त्यानंतर, हळूहळू दूधाबरोबरच अन्य पोषक आहार देण्यास सुरुवात करावी, आणि दोन वर्षापर्यंत ते देण्यात यावे असे, जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफचे म्हणणे आहे. रिपोर्ट्सनुसार ज्या मुलांना स्तनपान योग्य रितीने मिळाले त्यांचे मृत्यूचे प्रमाण अन्य मुलांच्या तुलनेत १४ वेळा कमी आहे. तर, सध्या ४१ टक्के मुलांनाचा योग्यतऱ्हेने आईचे दूध मिळत असल्याचेही या संघटनेचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी सन २०२५ पर्यंत स्तनपानाचे ४१ टक्क्यांचे हे प्रमाण ५० टक्क्यांवर आणण्याचे प्रयत्न करणार असल्याची जबाबदारी घेतली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार जगभरात झपाट्याने वाढला आहे. या विषाणूशी प्रत्येक देशातील आरोग्य विभागातील कर्माचारी लढा देत आहे आणि आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला आहे. अशावेळेस स्तनदा मातेला स्तनपानासंदर्भात माहिती आणि त्यांच्या आत्मविश्वास वाढविण्यासंदर्भात माहिती देण्याचे कार्य कमी पडत आहे, असे युनिसेफचे न्यूट्रिशन ऑफ चीफ डॉ. व्हिक्टर अगुआयो म्हणाले आहेत. प्रत्येक आईला आणि कुटूंबाला प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचार्‍यांकडून मुलांना जन्मापासूनच, स्तनपान मिळावे यासाठी आवश्यक मार्गदर्शन व पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात पसरलेल्या परिस्थितीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्याचा खासगी उत्पादन करणाऱ्या कंपन्या फायदा उचलत आहेत. यातील स्तनापानाला पर्यायी उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांचाही भडीमार आहे. तर, काही ठिकाणी कोरोना संशयित किंवा पॉझिटिव्ह असलेल्या मातेपासून बाळाचा जन्म होताच त्याला वेगळे केले जात आहे, आणि ते ही कोणत्या आधाराविना ते चूकीचे आहे.

रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत एकाही कोरोनाबाधित महिलेच्या दूधात अॅक्टीव्ह कोरोनाचे व्हायरस आढळून आलेले नाहीत. किंवा कोरोना संक्रमित आईच्या दूधापासून तिच्या बाळा संक्रमण होण्याची शक्यता असल्याचे कुठलेही प्रमाण नाही. त्यामुळे, कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करत प्रत्येक आईने आपल्या बाळाला दूध पाजावे, असे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.