नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा 471 वर पोहचला आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 37 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
COVID-19 LIVE : देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 467 वर, वाचा कोरोनासंबंधीच्या बातम्या एका क्लिकवर...
23:21 March 23
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा 471 वर पोहचला आहे.
23:21 March 23
श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तानने दिला आकस्मिक निधी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनो विषाणूविरोधात व्यापक उपाययोजना करण्यासाठी सार्क देशांच्या प्रतिनिधींना आकस्मिक निधी उभारण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तानने आकस्मिक निधी दिला आहे. अफगानिस्तान ने 10 लाख (डॉलर), श्रीलंकाने 50 लाख (डॉलर) आणि बांगलादेशाने 15 लाख (डॉलर) एवढा आकस्मिक निधी दिला आहे. निधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करून संबधीत देशांचे आभार व्यक्त केले.
23:21 March 23
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधील जनतेशी संवाद साधणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमधील जनतेशी संवाद साधणार आहेत. 25 मार्चला सांयकाळी 5 वाजता व्हिडीओ कॉन्फरस'च्या माध्यमातून ते संवाद साधतील. मोदींनी टि्वट करून ही माहिती दिली आहे.
21:56 March 23
कोरोना दहशत : कोलकाता शहरातील सीएएविरोधी आंदोलन मागे
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एनआरसी आणि सीएएविरोधामध्ये आंदोलन सुरु होते. दरम्यान कोरोनाचा प्रभाव पाहता कोलकाता शहरातील सीएएविरोधी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्त्याने सांगितले.
21:55 March 23
कोरोनाचा प्रभाव पाहता 31 मार्चपर्यंत संपूर्ण गुजरात बंद
नवी दिल्ली - देशभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी गुजरात सरकारने संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री 12 पासून ते 31 मार्चपर्यंत संपूर्ण राज्य बंद करण्यात येणार असून राज्याची सीमाही बंद करण्यात आली आहे. तसेच सरकारने लागू केलेल्या नियमांचे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे.
21:55 March 23
तीहार कारागृहातील 3 हजार कैद्यांना सोडण्यात येणार
नवी दिल्ली - कोरोना विषाणूबाधित रुग्णाची संख्या 467 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर तीहार कारागृहातील 3 हजार कैद्यांना सोडण्यात येणार आहे.
21:33 March 23
देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 467 वर, देशात आणि राज्यात किती नवे रुग्ण? पहा..
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 467 वर पोहचला आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 37 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
21:07 March 23
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 97 वर
मुंबई - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 97 वर पोहचला आहे. तर भारतामध्ये एकूण 433 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
21:07 March 23
राहुल गांधींनी मास्कच्या निर्यातीवरुन मोदींवर केला हल्लाबोल
नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 433 वर पोहचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मास्कच्या निर्यातीवरुन निशाणा साधाला आहे. व्हेंटिलेटर्स आणि मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं राखून ठेवण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनाने दिला होता. तरीही तीन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने उपकरणांच्या निर्यातीवर बंदी घातली. हा जनतेच्या जिवाशी केलेला खेळ कोणत्या ताकदीवरून केला आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
20:48 March 23
कोरोनाचा प्रभाव पाहता संपूर्ण नेपाळ लॉकडाउन
काठमांडू - जगभरामध्ये कोरोनाचा प्रभाव पाहता नेपाळमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतला असून. ३१ मार्च हा लॉकडाउन लागू असणार आहे. नेपाळमध्ये 2 कोरोना रुग्ण आढळल्याने सरकारने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
20:15 March 23
त्रीपूरा राज्य 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
कोरोनाचा प्रभाव पाहाता त्रिपूरा राज्य येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
19:29 March 23
हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाबाधित 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
शिमला - हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाबाधित 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती नुकतीच अमेरिकेवरून परतला होती.
18:58 March 23
केरळमध्ये आढळले तब्बल २८ नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९१
तिरुवअनंतपुरम - केरळमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. आज राज्यात २८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ९१ पोहचली आहे.
17:14 March 23
देशात आणि राज्यात किती नवे रुग्ण? पहा..
17:08 March 23
महाराष्ट्रात संचारबंदी लागू, सर्व जिल्हे केले लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची घोषणा..
मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत ही माहिती दिली.
16:49 March 23
बुधवारपासून आंतरराज्यीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय..
नवी दिल्ली - बुधवारपासून आंतरराज्यीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणण्याचा निर्णय केंद्रीय विमान मंत्रालयाने घेतला आहे. विमान कंपन्यांना असे सांगण्यात आले आहे, की मंगळवारी रात्री ११.५९ पूर्वी सर्व आंतरराज्यीय विमाने आपपाल्या गंतव्यस्थळी उतरवण्यात यावीत.
16:44 March 23
'हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन'चा वापर केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांसाठी, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण..
नवी दिल्ली - 'हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन' या औषधाचा वापर हा केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनीच करायचा आहे. तसेच, घरात क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी हे औषध घ्यायचे आहे. केवळ खबरदारी म्हणून हे औषध घेणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
15:42 March 23
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर मलेरियाचे औषध वापरण्यास परवानगी..
नवी दिल्ली - राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कोरोनासाठी स्थापण्यात आलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने गंभीर रुग्णांसाठी मलेरियाचे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे. 'हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन' असे या औषधाचे नाव आहे.
15:37 March 23
तामिळनाडूमध्ये उद्यापासून कलम १४४ लागू..
चेन्नई - तामिळनाडूमध्ये उद्या (मंगळवार) सायंकाळी सहा वाजेपासून ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. यादरम्यान दूध, भाजीपाला, किराणा सामान, मटन-चिकन आणि मासे विक्री सुरू राहणार आहे. तसेच राज्याच्या सीमा बंद करण्यात येतील. मुख्यमंत्री पलानिसामी यांनी राज्याच्या विधानसभेत ही माहिती दिली.
तसेच, यादरम्यान सरकारमार्फत चालवले जाणारे अम्मा कँटीन सुरू राहणार आहेत. सरकारने सर्व खासगी कंपन्यांना असे आदेश दिले आहेत, की आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
13:51 March 23
तेलंगाणामध्ये आढळले सहा नवे रुग्ण, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर..
हैदराबाद - तेलंगणामध्ये कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. तेलंगाणा सरकारने याबाबत माहिती दिली आहे.
13:47 March 23
कोणत्या राज्यात किती रुग्ण? पहा..
13:46 March 23
नवी मुंबई - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरातून मोठ्या प्रमाणावर गावी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. एसटी व इतर बससेवा बंद झाल्याने लोकं मिळेल त्या वाहनांनी गावी जात आहेत. त्यामुळे कळंबोली कामोठे येथून सुरू होणारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वाचा : COVID-19 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी बंद
13:33 March 23
इटली (मिलान) - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या या व्हायरसने नंतर इटलीमध्येही रौद्ररूप धारण केले आहे. कोरोनामुळे इटलीत जवळपास साडेपाच हजार लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, इटलीच्या मिलान शहरामध्ये शिक्षण घेत असलेला मराठी तरुण अनिकेत जोशी याच्यासोबत केलेली ही खास बातचीत...
पाहा : #CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा
13:32 March 23
मुंबई- बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राचे वितरण आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ही बंदी असणार आहे. वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते, डेपोधारक, वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी, वृत्तपत्र टाकणारी मुले ही सर्व सहभागी असतात. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाजास्तव वितरण थांबवण्यात येत आहे, असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने एका परित्रकाद्वारे माहिती दिली.
13:32 March 23
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याहून दिल्लीला पोहचलेल्या एका विमानात कोरोनाबाधीत प्रवासी असल्याची माहीती प्रवाशांना मिळाली. त्यामुळे घाबरलेल्या वैमानिकाने चक्क विमानाच्या खिडकीतून उडी मारली आहे.
वाचा : विमानात 'कोरोना'बाधित प्रवासी..! वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी
11:55 March 23
'...मेरे पास मास्क है', नागपूर पोलिसांची अनोखी जनजागृती
नागपूर - सध्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सगळेजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. अनेकजण पोस्टर, बॅनर, विविध मॅसेजद्वारे कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी जनजागृती करत आहेत. यात नागपूर पोलिसांनी हातभार लावत एक अनोखा व्हिडिओ आपल्या ट्विटरद्वारे शेअर केला आहे.
11:42 March 23
मुंबईतील 6 रुग्णांची कोरोनावर मात; वैद्यकीय अहवाल 'निगेटिव्ह'
मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने राज्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले कोरोनाचे 6 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
वाचा : मुंबईतील 6 रुग्णांची कोरोनावर मात; वैद्यकीय अहवाल 'निगेटिव्ह'
11:31 March 23
नाशिक - कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारने 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून 31 मार्चपर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला आहे.
वाचा : कोरोना इफेक्ट : 31 मार्चपर्यंत नाशकातील नोटा छपाई राहणार बंद...
11:07 March 23
काटेकोरपणे लॉकडाऊन लागू करा, नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा द्या; केंद्राचे राज्यांना आदेश..
नवी दिल्ली - पंतप्रधानांनी थोड्याच वेळापूर्वी लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यांना काटेकोरपणे बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच जे लोक नियमभंग करत घरातून बाहेर पडतील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असेही केंद्राने राज्य सरकारला सांगितले आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४१५ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
10:33 March 23
कोरोनासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष रुग्णालय; १००० व्हेंटिलेटर्सही मागवले; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती..
बंगळुरू - कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तसेच, आम्ही १००० व्हेंटिलेटर्सही मागवले आहेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिली. राज्यात कोरोनाचे २७ रुग्ण आढळून आले आहेत.
10:30 March 23
गुजरातमध्ये आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण, राज्यातील एकूण संख्या २९वर..
गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २९ वर पोहोचली आहे. यांपैकी एकाचा बळी गेला आहे.
10:18 March 23
नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत; पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी..
नवी दिल्ली - देशातील नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. कृपया स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करा. माझी राज्य सरकारांना विनंती आहे, की आपापल्या राज्यांमध्ये सर्व नियमांचे आणि कायद्यांचे पालन केले जात आहे, याची खात्री करुन घ्यावी. अशा आशयाचे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केले आहे.
10:07 March 23
कोरोनाचा शेअर बाजारावर परिणाम कायम; ४५ मिनिटांसाठी सर्व व्यवहार थांबवले..
मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडताच १० टक्क्यांनी निर्देशांक गडगडल्यामुळे लोअर सर्किट लागू झाले. परिणामी ४५ मिनिटांसाठी शेअर बाजारातील सर्व व्यवहार थांबवण्यात आले आहेत.
09:55 March 23
सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडला, कोरोनाचा प्रभाव कायम..
मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स २,५३२.७४ अंशांनी पडून २७,३८३.२२ अंशांवर स्थिरावला होता. तर निफ्टी ६२५.४५ अंशांनी पडून ७,९४५.७० अंशांवर स्थिरावला होता.
09:52 March 23
मुंबईत ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर..
मुंबई - मुंबईमध्ये एका ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. फिलिपाईन्सवरून आलेल्या या व्यक्तीला आधी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र नंतर केलेल्या चाचणीमध्ये तो कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले होते. मधुमेह आणि दम्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या सध्या ८९ आहे.
09:47 March 23
जगभरात थैमान घातलेला कोरोना आता भारतातही वेगाने पसरत आहे. देशात कोरोनाचे सुमारे ४०० रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जगभरात साडेतीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.