नई दिल्ली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. कोरोना साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी, डॉक्टर रात्रंदिवस जीवाचा पर्वा न करता सेवा देत आहेत. मात्र, त्याच्या संरक्षणासाठी देशात पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किटची कमतरता आहे. केजरीवाल सरकारनेही केंद्राकडे या किटची मागणी केली आहे. मात्र, त्यातच उत्तर रेल्वेने एक किट बनविली आहे. डीआरडीओकडून त्याला ग्रीन सिग्नलही मिळाले आहे.
हेही वाचा- COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागाने पीपीई किट तयार केली असून ही किट उत्तर रेल्वे विभागाच्या जगाधरी कार्यशाळेत तयार केली गेली आहे. विशेष म्हणजे डीआरडीओकडून त्याला ग्रीन सिग्नलही मिळाले आहे. आता या किटचे उत्पादन वाढविले जाणार आहे. जेणेकरुन डॉक्टर आणि सर्व पॅरामेडिकल कर्मचार्यांना याचा उपयोग करता येईल. किट बनविणे ही मोठी कामगिरी आहे. भारत सरकारबरोबर कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही मदत करीत आहोत असे, उत्तर रेल्वेचे सरव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सागितले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 13 वा दिवस आहे.