हैदराबाद - जगभरातील संशोधक आणि फार्मा कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यात व्यग्र आहेत. कार्यक्षम तसेच सुरक्षित लस तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आता कोरोना जगभर पसरून सुमारे १० महीने झाले आहेत. विविध कंपन्यांनी तयार केलेल्या लसीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरण कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. भारतातही लसीकरणासाठी सरकारी पातळीवर नियोजन करण्यात येत आहे.
लसीला मान्यता मिळाल्यानंतर त्याची साठवणूक कशी होणार, वाहतूक सुविधा, कोल्ड स्टोरेज (शीतगृहात लस ठेवण्याची सुविधा), सर्वात आधी लसीकरण कोणाचे होणार हे एक मोठे आव्हान सरकारपुढे आहे. मागील काही महिन्यांपासून आरोग्य मंत्रालय आणि संबधीत विभागांनी संसाधनांची जुळवाजुळव सूरू केली आहे. लस तयार झाल्यास त्याच्या वितरणाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
कोल्ड स्टोरचे निभावणार कळीची भूमिका
कोणत्याही आजारावरील लस सहसा शीतगृहात ठेवली जाते. जर अधिक तापमानाशी लसीचा संबंध आला तर तिची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, फायजर कंपनीने तयार केलेली लस उणे ७० डिग्री सेल्सिअल तापमानात ठेवण्याची आवश्यकता आहे. अंटार्टिका खंडावरील तापामानपेक्षाही कमी तापमानात ही लस ठेवावी लागते. त्यामुळे जर लाखो नागरिकांचे लसीकरण करायचे असल्याचे कोल्ड स्टोरेजची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. शीतगृहांची साखळी उभी केल्यास लसीकरण वेगाने होऊ शकते. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे लस ठेवण्याची क्षमता भारताकडे किती आहे हे आपल्याला पहावे लागेल.
सध्या भारताची शीतगृहाची क्षमता
सरकारी शीतगृहे - २० ते २५ कोटी लसींचे डोस ठेवण्याची क्षमता
खासगी शीतगृहे - २५ ते ३० कोटी लसींचे डोस ठेवण्याची क्षमता
एकूण क्षमता - ४५ ते ५५ कोटीची क्षमता
सध्या वापरात असलेले शीतगृहे (इलेक्ट्रिक आणि नॉन इलेक्ट्रिक )
प्रकार तापमान (डिग्री सेल्सिअस)
कोल्ड रुम २ ते ८
वॉक कूलर २ ते ८
वॉक इन फ्रीजर -१५ ते -२५
आईस लाईन्ड फ्रीजर २ ते ८
डीप फ्रीजर -१५ ते -२५
नॉन इलेक्ट्रिक
कोल्ड बॉक्स २ ते ८
व्हॅक्सिन कॅरिअर २ ते ८
कोल्डचेन ( शीतगृहांची साखळी) म्हणजे काय?
जगभरातील सर्वांना लसीचा पुरवठा करणे हे एक भव्यदिव्य काम आहे. सर्वात आधी लस कोरोना योद्ध्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस, लहान बालके आणि वयस्कर व्यक्तींना देण्याचे नियोजन सुरू आहे. तापमान नियंत्रण करता येऊ शकणाऱ्या शीतगृहांची मोठी साखळी या कामासाठी गरजेची आहे. समन्वय साधून एका ठिकाणावरून लस दुसऱ्या ठिकाणी नेता आली पाहिजे. त्यासाठी अनेक ठिकाणी शीतगृहांचे जाळे विनलेले हवे. या वाहतूक आणि साठवणूक व्यवस्थेस कोल्ड चेन असे म्हणतात.
आघाडीच्या कोरोना लसीचे तापमान किती?
फायजर कंपनीने तयार केलेली कोरोनावरील लस उणे ७० डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. मात्र, सध्या जगभरात जी शीतगृहे आहेत, त्यात फक्त उणे २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात लस ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे ऑक्फर्ड, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन, नोवाव्हॅक्स यांनी तयार केलेली लस फायजरच्या तुलनेने कमी तापमानात टिकू शकते. त्यामुळे भारताला लसीचा पुरवठा करण्यासाठी या कंपन्यांचे पर्याय खुले आहेत.
फायजर बायोटेक -७० डिग्री सेल्सिअस
मॉडेर्ना -२०
ऑक्सफर्ड, अस्त्राझेनेका २ ते ८ डिग्री
जॉनसन अॅन्ड जॉनसन २ ते ८
नोव्हाव्हॅक्स २ ते ८
भारतात शीतगृहांची सुविधा अपुरी असण्याचे कारण
पायाभूत सुविधांची कमतरता, या क्षेत्रातील अकुशल कामगार, जुने तंत्रज्ञान, अनिश्चित वीज पुरवठा अशा कारणांमुळे भारतात शीतगृहांची सुविधा निर्माण झाली नाही. शीतगृहांच्या कमतरतेमुळे भारतात दरवर्षी नाशवंत शेती मालाचेही मोठे नुकसान होते.
वाहतूक व्यवस्था -
लसीच्या वाहतूकीसाठी हवाई मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विविध तापमान असेलल्या देशांत योग्य नियोजनाद्वारे लसीची वाहतूक केली जाते. जलदपणे लस वाहतूक करणे अंत्यत गरजेचे आहे. कोरोना लसीच्या वाहतूकीसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावर तयारी सुरू आहे. विमानळावर लस साठवणूकीची आणि वितरणाची सुविधा महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठे सुमारे ३० हजार टन क्षमतेचे शीतगृह साठवण केंद्र आहे. आयात-निर्यातीसाठीची सर्व सुविधा या विमानतळावर उपलब्ध आहे. ४ हजार स्केअर मीटर भागावर ही सुविधा उभारण्यात आली आहे. यासोबतच खासगी मालवाहतूक आणि साठवण कंपन्यांही कळीची भूमिका निभावणार आहेत.