ETV Bharat / bharat

कोरोना विरोधी 40 पेक्षा जास्त लसींचं काम प्रगतीपथावर, मात्र... - भारत कोरोना बातमी

मागील पाच दिवसांपासून सरासरी 15 हजार 747 वैद्यकीय नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील सरासरी 584 जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, अशी माहिती मुऱ्हेकर यांनी दिली.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 12, 2020, 5:13 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या जीवघेण्या विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक रात्रंदिवस काम करत आहेत. भारतात कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. '40 विविध लसी बवनिण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही लस विकासाच्या पुढच्या टप्प्यावर पोहचली नाही. त्यामुळे अजून कोरोनावर कोणतीही लस नाही', अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सिसर्च संस्थेचे डॉ. मनोज मुऱ्हेकर यांनी दिली आहे.

  • More than 40 vaccines are under development but none have reached the next stage. As of now, there is no vaccine: Dr. Manoj Murhekar, Indian Council of Medical Research (ICMR) on #COVID19 pic.twitter.com/pzo8ybnzG9

    — ANI (@ANI) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मागील पाच दिवसांपासून सरासरी 15 हजार 747 वैद्यकीय नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील सरासरी 584 जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, अशी माहितीही मुऱ्हेकर यांनी दिली. भारतामध्ये संभाव्य कोरोनाग्रस्तांची चाचणी घेण्याचे काम आयसीएमआर संस्थेच्या निगराणीखाली सुरू आहे. सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळेतही चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 11 एप्रिलपर्यंत देशभरात 1 लाख 64 हजार 773 संभाव्य कोरोनाग्रस्तांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यातील 7 हजार 703 व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहीत आयसीएमआरने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.