करनाल (हरियाणा)- रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून पडून एका कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सीएम शहरातील कल्पना चावला रुग्णालयात घडली आहे. मृत्यू झालेला व्यक्ती हा पानिपत येथील रहिवाशी होता. त्याला रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाने चादर आणि पॉलिथीनची दोरी बनवून सहाव्या मजल्यावरील खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खाली पडून या रुग्णाचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, कोरना संशयित रुग्णालयातून पळाले, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला या सारख्या अनेक घटना घडल्याचे संपूर्ण देशातून पुढे येत आहे. यातून कोरोनाबाबत जनजागृती होत असताना देखील देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- 'चिनी विषाणू परत जा', लॉकडाऊनचे नियम धाब्याबर बसवून भाजप आमदाराची घोषणाबाजी