बंगळुरू - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ६० जवळ आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच दुबईतून भारतात परतलेल्या मोहम्मद हुसेन(७६) या कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वार्डमध्ये या रुग्णावर उपचार सुरू होते.
पुढील उपचारासाठी रुग्णाला हैदराबाद येथेही आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कर्नाटकातील कलबुर्गी येथे हलविण्यात आले होते. हुसेन यांना खोकला आणि ताप होता. बंगळुरु येथे रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी करण्याती आली आहे. आज सायंकाळी चाचणीचा अहवाल येणार आहे. नक्की कोरोनामुळे की दुसऱ्या कारणाने रुग्णाचा मृत्यू झाला हे प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.