चेन्नई (तामिळनाडू) - येथील एका 42 वर्षीय कोरोना बाधित महिलेने मंगळवारी एक मुलीला जन्म दिला आहे. या कोरोना बाधित महिलेला येथील आरएसआरएम सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नवजात मुलीचे वजन 2.8 किलो आहे. ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
या महिलेला तिच्या पतीपासून कोरोनाची लागण झाली होती. तिच्या पतीने मार्चमध्ये दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर 30 मार्चला तो कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. पतीच्या कोरोना निदानानंतर, त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोरोनाची बाधा झाली. यानंतर परिवारातील या तिघांना चेन्नईतील स्टॅनलि रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या 3 एप्रिलपासून तिच्यावर उपचार सुरू होते. यानंतर 16 एप्रिलला प्रसूतीसाठी शासकीय आरएसआरएम रूग्णालयात पाठवण्यात आले.
येथील डॉक्टरांनी या गर्भवती महिलेची विशेष काळजी घेतली. तिच्या आरोग्य चांगले रहावे, तिची आणि बाळाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी विशेष सप्लिमेंट पुरवल्यात. यानंतर त्या महिलेने मंगळवारी एका बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती सुरक्षित आहे. यानंतर या दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या महिलेने सर्व डॉक्टरांचे आभार मानले. पैसे आहेत तरीसुद्धा अशा परिस्थितीत नातेवाईक पाठिंबा देण्यासाठी येऊ शकत नाहीत. मात्र, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मनोबल वाढवले, अशी भावना या महिलेने व्यक्त केली आहे.
एक गर्भवती कोरोना बाधित महिलेने एका बाळाला जन्म दिला आणि ते बाळ कोरोना बाधित नसल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.