ETV Bharat / bharat

CORONA UPDATE: भारतात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ६०६.. जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय द्वारे आज (25 मार्च) सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 606 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. 42 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona positive cases
कोरोना
author img

By

Published : Mar 25, 2020, 10:18 PM IST

नवी दिल्ली - आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या 606 वर पोहोचली आहे.

कर्नाटकात मागील 24 तासात 10 कोरोनोग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 51 वर पोहचली आहे. यातील 3 रुग्ण पुर्णत: बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. यासह देशातील विविध राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

corona positive cases
भारतातील कोरोना आकडेवारी

विविध राज्यातील आजची कोरोनाची स्थिती

केरळ राज्यात आज नव्याने 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचा आकडा 112 वर. 9 रुग्णांमधील 4 दुबईवरून माघारी आले होते. तर एकजण फ्रान्स आणि इंग्लमधून माघारी आला होता.
महाराष्ट्रात कोरोनाचे 122 रुग्ण, मुंबईत 10 तर सांगलीत पाच नवे रुग्ण आढळून आले.
दिल्लीतील मौजापर भागात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. मौहल्ला क्लिनिकमध्ये हा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून ज्यांनी या क्लिनिकमध्ये गेले असतील त्यांनी एकांतवासात रहावे असे आदेश शहादा प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी दिेले आहेत.
शक्य असेल तर जिल्हा न्यायाधीश आणि इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
गोव्यात अडकलेले 126 रशियान नागरिक मायदेशी परतले.
हरियाणातील पानिपतमध्ये नर्सला कोरोनाची लागण, एकून 17 जणांना लागण
दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे 5 नवे रुग्ण, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱयांना दिल्ली सरकार विशेष पास देणार
छत्तीसगडमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले, एकून 3 रुग्ण
हिमाचल प्रदेशातील 19 कोरोना संशयितांना ठेवण्यासाठी वसतीगृहाचा वापर, एनआयटी हमिरपूर वसतीगहात आता कोरोना संशयित रुग्ण
उत्तरप्रदेशात आणखी एकाला कोरोनाची लागण, एकून आकडा 38
उत्तराखंडमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचे चार नवे रुग्ण, एकून रुग्ण 11
मध्यप्रदेशात सहा नवे कोरोनाचे रुग्ण, राज्यात आत्तापर्यंत 15 रुग्ण. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकाराला कोरोनाची लागण
तामिळनाडूतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पुढल्या वर्गात ढकलणार, कोरोनाची परिस्थिती पाहता घेतला निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.