हैदराबाद- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल (3 जुलै) भारतात 52 हजार 972 कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 18 लाखाच्या पार गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबरोबर देशातील कोरोना चाचणी संख्येला देखील वेग आला आहे. कालपर्यंत कोरोनाचे 2 कोटींहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. देशात सध्या 18 लाख 3 हजार 696 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 5 लाख 79 हजार 357 सक्रिय रुग्ण आहेत. तर 771 कोरोना रुग्णांचा काल (3 जुलै) मृत्यू झाला आहे.
दिल्लीत काल 805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दिल्ली- दिल्लीत काल 805 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजधानीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38 हजार 482 झाली आहे. काल 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 4 हजार 21 झाली आहे. तसेच, 937 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने एकाचवेळी राहणार उघडी
मुंबई- मिशन बिगीन अगेन अंतर्गत बृहणमुंबई महानगरपालिकेने मुंबईतील व्यावसायिकांना आनंदाची बातमी दिली आहे. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने एकाचवेळी सुरू ठेवता येणार आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.
आता 'या' तारखांना पश्चिम बंगालमध्ये असणार लॉकडाऊन
पश्चिम बंगाल- सरकारतर्फे लॉकडाऊनच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता राज्यभरात 5 ऑगस्ट (बुधवार), 8 ऑगस्ट (शनिवार), 20 ऑगस्ट (गुरुवार), 21 ऑगस्ट (शुक्रवार), 27 ऑगस्ट (गुरुवार), 28 ऑगस्ट (शुक्रवार), 31 ऑगस्ट (सोमवार) या दिवशी लॉकडाऊन असणार आहे.
ओडिशात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे कामकाज होणार सुरू
ओडिशा- सरकारने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना सामान्य कामकाजास परवानगी दिली आहे. यात मोठ्या बँकांमध्ये 50 टक्के कर्मचारी कामावर ठेवण्याची मूभा देण्यात आली आहे. आणि छोट्या शाखांमध्ये 5 टक्के कर्मचारी ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. खाजगी बँकांना ही मूभा 31 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 1 हजार 384 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
केरळमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत सार्वजनिक ठिकाणांवर होणाऱ्या आंदोलनांना रोक
केरळ- कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवर आंदोलन करण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते. या प्रतिबंधास केरळ उच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट पर्यंत वाढवले आहे.
मध्यप्रदेशात मंदिरात सुंदरकांड आणि रामधून लावण्यास परवानगी
मध्यप्रदेश- अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरात रामधून आणि सुंदरकांड वाजविण्याची परवानगी दिली आहे. काल आणि आज असे दोन दिवस सरकारने परवानगी दिली असून हे कार्य करत असताना कोरोनापासून बचावसाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
तामिळनाडूत कोरोनाचा उद्रेक, काल दिवसभरात 5 हजार 609 कोरोनाबाधितांची नोंद
तामिळनाडू- राज्यात काल 24 तासात 5 हजार 609 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 222 इतकी झाली असल्याची माहिती राज्य सास्वथ विभागाने दिली आहे.
तेलंगाणात काल दिवसभरात 983 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
तेलंगाणा- राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात राज्यात 983 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 660 झाली आहे. यात 18 हजार 500 सक्रिय रुग्णांचा समावेश आहे. तसेच राज्यातील 48 हजार 609 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनामुळे 551 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
हेही वाचा- सैन्यदलाने उत्तर लडाखमध्ये वाढविले सामर्थ्य; चीनला प्रत्युत्तर देण्याची तयारी