ETV Bharat / bharat

कोविड-19 महामारीने नव्या कल्पना आजमावण्याची संधी दिली - राहुल गांधी

'आपण कोरोनातून नवीन कल्पना घेऊन बाहेर पडत नसू तर, वैयक्तिक आणि राष्ट्र या नात्याने आपण मोठी संधी गमावली आहे,' असे ते म्हणाले. ‘मला वाटते, कोरोना सांगत आहे, आपण आतापर्यंत जे करत होतो, ते समस्याप्रधान आहे. कोऱ्या पानाने आणि नवीन कल्पनेने सुरुवात करा,’ असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी न्यूज
राहुल गांधी न्यूज
author img

By

Published : Jul 31, 2020, 4:04 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्याशी संवाद साधला. या संभाषणात कोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ ही देशाची नव्याने रचना करण्याची आणि नवीन कल्पना राबवण्याची संधी असल्याचे राहुल म्हणाले.

'आपण कोरोनातून नवीन कल्पना घेऊन बाहेर पडत नसू तर, वैयक्तिक आणि राष्ट्र या नात्याने आपण मोठी संधी गमावली आहे,' असे ते म्हणाले. ‘मला वाटते, कोरोना सांगत आहे, आपण आतापर्यंत जे करत होतो, ते समस्याप्रधान आहे. कोऱ्या पानाने आणि नवीन कल्पनेने सुरुवात करा,’ असे ते पुढे म्हणाले.

‘आताच्या तरुण पिढीमध्ये काहीतरी चुकत असल्याची भावना आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक आभासी आहे. अजून काही लोकांकडून नव्या कल्पनांना विरोध केला जात आहे किंवा तशा विचारांना विरोध होत आहे,’ असे राहुल यांनी सांगितले.

कोविड संकटादरम्यान गरीब लोकांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा न केल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला. "भारतातील स्थलांतरितांचा प्रश्न तत्काळ सोडवण्याची गरज होती. तसेच, अचानक अडचणीत सापडलेले सूक्ष्म उद्योजकांनाही आपापल्या गावी परत जाणे भाग पडले. या लोकांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र, सरकारला तसे वाटले नाही,' असे आरोप त्यांनी केला.

राहुल यांनी सूक्ष्म उद्योजकांना देशाची सर्वात मोठी संपत्ती म्हणून संबोधले. ग्रामीण अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची पुनर्रचना ही गरज असल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधींच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कल्पनेचाही त्यांनी उल्लेख केला. ‘आम्ही पश्चिमेकडील आर्थिक व्यवस्थेचा अवलंब केला. मात्र, भारत आणि बांगलादेशसारख्या देशांच्या लोकांच्या अधिकच्या आणि विविध प्रकारच्या क्षमतांबद्दल विचार केला नाही. त्यांच्याकडे अतिशय सर्जनशील गोष्टी करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांचे कौतुक आणि समर्थन करणे आवश्यक होते. मात्र, तसे करण्यात सरकार अपयशी ठरले.'

'ग्रामीण अर्थव्यवस्था ही शहरी अर्थव्यवस्थेसाठी पुरवठादार किंवा काही प्रमाणात हवे ते पुरवण्याचा स्रोत बनली आहे. शहरी अर्थव्यवस्था म्हणजे कामांचा केंद्रबिंदू आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेकडून कामगारांचा पुरवठा केला जातो, असा पाश्चात्य पारंपरिक दृष्टिकोन आहे. मात्र, आपल्या देशात ग्रामीण अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होणे शक्य होते. तसे झालेले नाही,' असे ते पुढे म्हणाले.

संवाद हा कॉंग्रेसच्या 'व्हिडिओ सीरिज - राहुल गांधींशी संभाषण'चा भाग होता. या अगोदर, काँग्रेस नेते जगभरातील भारतीय परिचारिकांशी बोलले होते. तसेच, त्यांनी बजाज उद्योगांचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक प्रोफेसर आशिष झा, नोबेल पुरस्कार विजेते नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर जोहान गिसेके बॅनर्जी आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशीही संवाद साधला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.