नवी दिल्ली - जनावरे घेऊन जाणारा कंटेनर पलटल्यामुळे 6 युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरोहाच्या मोहम्मदाबादमध्ये ही घटना घडली आहे. टायर पंक्चरमुळे वेगाने जाणारे कंटेनर उलटले. त्याखाली आल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कंटेनरखाली 15 जनावरे चिरडली गेली आहेत.
अमरोहा येथील राष्ट्रीय महामार्गावर सकाळी जनावरांनी भरलेल्या कंटेनर उलटला. जयपूरहून जनावरे घेऊन जाणारा कंटेनर डिडौली परिसरातील ढकिया चमन गावाकडे जात होता. यात 25 जनावरे आणि 20 हून अधिक लोक होती. कंटेनरचे टायर पंक्चर झाल्याने तो अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईत उलटला.
जखमींना रुग्णालयात दाखल केलं -
कटेंनर उलटल्याच्या आवाजाने स्थानिक जमा झाले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आणि स्थानिकांनी कटेंनरखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानीकांच्या मदतीने गाडीखाली अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना तातडीने बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.