ETV Bharat / bharat

कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसची आजपासून देशव्यापी मोहीम; दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणार

या मोहिमेमध्ये, तीन शेतकरी विधेयकांविरोधात देशभरातून दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस, राज्य प्रमुख आणि विशेष समीतीच्या एका बैठकीत याबाबत रणनिती आखण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरला दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली पत्रे काँग्रेस राष्ट्रपतींकडे सुपूर्द करेल, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी दिली आहे.

Congress to hold nationwide protest against farm bills from Sept 24
कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसची आजपासून देशव्यापी मोहीम; दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणार
author img

By

Published : Sep 24, 2020, 10:35 AM IST

Updated : Sep 24, 2020, 11:02 AM IST

नवी दिल्ली : काँग्रेस आजपासून शेतकरी विधेयकांविरोधात देशव्यापी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेमध्ये, तीन शेतकरी विधेयकांविरोधात देशभरातून दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस, राज्य प्रमुख आणि विशेष समीतीच्या एका बैठकीत याबाबत रणनिती आखण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यांचे प्रमुख आणि काही वरिष्ठ नेते आज माध्यमांना संबोधित करतील. तसेच, २८ सप्टेंबरला शेतकरी विधेयकांविरोधात देशव्यापी आंदोलनही घेण्यात येईल. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेस 'किसान-मजदूर बचाओ दिवस'चे आयोजन करणार आहे. देशभरातील जिल्हा मुख्यालये, आणि संसदेमध्ये धरणे आंदोलन आणि मोर्चे काढून हे आंदोलन करण्यात येईल. शेवटी, १४ नोव्हेंबरला दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली पत्रे काँग्रेस राष्ट्रपतींकडे सुपूर्द करेल, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी दिली आहे.

ज्या प्रकारे राज्यसभेमध्ये दोन कृषी विषयक विधेयके मंजूर करण्यात आली, ती लोकशाहीची हत्या आहे. ही कृषी विधेयके ना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत, ना राज्य सरकारांच्या. आम्ही संसदेमध्ये यांविरोधात आवाज उठवला, आता आम्ही त्यासाठी रस्त्यावरही उतरत आहोत, असे मत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : ओडिशा : भारतीय बनावटीच्या पृथ्वी - 2 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Last Updated : Sep 24, 2020, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.