ETV Bharat / bharat

पोटनिवडणूक झाल्यानंतरच ठरणार गोव्याची राजकीय गणितं - power

काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यातील ३ विधानसाभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतरच पुढची दिशा ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

पोटनिवडणूकीनंतरच ठरणार गोव्याची राजकीय गणितं
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:45 PM IST

गोवा - काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने गोव्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, राज्यातील ३ विधानसाभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतरच पुढची दिशा ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

गोवा विधानसभेसाठी २०१७ साली निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसला १७ जागांवर विजय मिळाला. विधानसभेमध्ये सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्ड पार्टीचे ३ आणि ३ अपक्षांच्या मदतीने भाजपाने सत्ता स्थापन केली. संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

विधानसभा स्थापन झाल्यावर काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले विश्वजित राणे यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले.

२०१८ मध्ये सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे डिसूझा यांच्या निधनामुळे म्हापसा मतदारसंघातही निवडणूक होणार आहे.

भाजपला गोव्यामध्ये आता लोकसभेबरोबर पोटनिवडणुकांचीही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लक्ष मांद्रे विधानसभा मतदारसंघाकडे आहे. या विधानसभेमध्ये भाजपातर्फे दयानंद सोपटे उमेदवार आहेत.

मांद्रे विधानसभा मतदारसंघ

दयानंद सोपटे यांनी २०१७ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर सलग चारवेळा विजयी झाले होते.

शिरोडा विधानसभा मतदारसंघ

शिरोडा विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूकही भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ साली विजयी झालेले सुभाष शिरोडकर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भाजपात आले. त्यांनी भाजपच्या महादेव नाईक यांचा पराभव केला होता.

म्हापसा विधानसभा मतदारसंघ

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसूझा यांचे या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. डिसूझा म्हापसा मतदारसंघातून निवडून येत असत. १९९९ साली गोवा राजीव काँग्रेसतर्फे जिंकल्यानंतर त्यांनी सलग चार निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. या सर्व पोटनिवडणुकांच्या निकालावरच भाजपाचे विधानसभेतील गणित ठरणार आहे.

Intro:Body:

Congress stakes claim to form government in Goa

.

   पोटनिवडणूक झाल्यानंतरच ठरणार गोव्याची राजकीय गणितं

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.