नवी दिल्ली - काँग्रेस आज निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यामध्ये ७२ हजाराच्या हमीसोबतच बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे वचनही काँग्रेस देणार आहे. तर, आरोग्य, शिक्षण आणि अल्पसंख्यांक समुदायाचाही घोषणापत्रात विचार केला जाणार आहे.
यावेळी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्ष महासचिव प्रियांका गांधी वॉड्रा, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग, मध्यप्रशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित उपस्थित राहणार आहेत. घोषणापत्राची थिम 'अन्याय से न्याय' ठेवण्यात आली आहे.