ETV Bharat / bharat

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचा शेक्सपियर अवतार, छायाचित्र व्हायरल - Shashi Tharoor

सुप्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एक छायाचित्र  ट्विट केले आहे.

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचा शेक्सपियर अवतार, छायाचित्र व्हायरल
author img

By

Published : Aug 11, 2019, 1:35 PM IST

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एक छायाचित्र ट्विट केले आहे. या छायाचित्रात शशी थरूर शेक्सपियरसारखे दिसत आहेत. त्यांचे हे छायाचित्र सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे.

शशी थरूर यांचे हे छायाचित्र अज्ञात व्यक्तीने तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले. ते छायाचित्र पाहून शशी थरूर इतके उत्सुक झाले की, त्यांनी आपल्या टि्वटरवर ते शेअर केले.

Congress leader Shashi Tharoor a makeover to make him look like Shakespeare
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचा शेक्सपियर अवतार, छायाचित्र व्हायरल
'आज व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वात कौतुकास्पद छायाचित्र शेअर होतेय. मला आश्चर्य वाटले की एखाद्याने मला शेक्सपियर बनविण्याचा विचार केला. त्यानंतर ते बनवण्यासाठी मेहनत घेतली. मला शेक्सपीयर केल्याबद्दल धन्यवाद, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी शशी थरुर यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात व्याख्यान देताना शशी थरुर यांना एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर काय घडले असते? त्यावर शशी थरुर यांनी व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचे राज्य असते असे उत्तर दिले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.