ETV Bharat / bharat

शीला दीक्षितांनी केलेली कामे दाखवण्याच्या प्रयत्नांना उशीर झाला, काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची प्रतिक्रिया - दिल्ली काँग्रेस पराभव

दिल्ली निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी आमच्यासाठी आश्चयकार्यक नव्हती. या निवडणुकीत आम्ही कोठेही नव्हतो असे मत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.

संदीप दिक्षित
संदीप दिक्षित
author img

By

Published : Feb 11, 2020, 6:07 PM IST

Updated : Feb 11, 2020, 7:11 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचा झेंडा फडकला आहे. देशभरातील दिग्गज नेत्यांची फौज दिल्लीत प्रचाराला आणूनही भाजपचा पराभव झाला आहे. फक्त ८ जागा भाजपने जिंकल्या तर काँग्रेला भोपळाही फोडता आला नाही. तीन वेळा काँग्रेसच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शिला दिक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

'दिल्ली निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी आमच्यासाठी आश्चयकार्यक नव्हती. या निवडणुकीत आम्ही कोठेही नव्हतो. आम्ही शीला दीक्षित यांनी केलेले काम दाखवण्याच प्रयत्न केला. मात्र, त्यासही उशीर झाला. सुभाष चोप्रा यांना खूप उशिरा दिल्ली निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली', असे संदीप दीक्षित यांनी सांगितले.

  • Sandeep Dikshit, Congress: Congress' performance is not surprising...We were nowhere there. We tried to showcase the work done by Sheila ji but it was done really late because unfortunately Subhash Chopra ji was given the responsibility really late. #DelhiResults pic.twitter.com/PxXk4Oxibo

    — ANI (@ANI) February 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मागील सहा-सात वर्षात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शीला दीक्षित यांना फक्त नावे ठेवली. त्या सत्तेत असतानाही त्यांचा अपमान करणं सुरूच होते. जेव्हा तुम्ही असे काम करता आणि नंतर दिल्लीत केलेल्या कामांचे श्रेय घेता, कोण तुमच्यावर विश्वास ठेवेल'? असे म्हणत दीक्षित यांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर टीका केली.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीत पराभव झाला असला तरी काम करणे सुरूच ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाल यांनी दिली आहे.

Intro:Body:

'दिल्लीत शिला दिक्षित यांनी केलेली काम दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोही उशीरा'    

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचा झेंडा फडकला आहे. देशभरातील दिग्गज नेत्यांची फौज दिल्लीत प्रचाराला आणूनही भाजपचा पराभव झाला आहे. फक्त ८ जागा भाजपने जिंकल्या तर काँग्रेला भोपळाही फोडता आला नाही. तीन वेळा काँग्रेसच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शिला दिक्षित यांचे पुत्र संदीप दिक्षित यांनी काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.   

दिल्ली निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी आमच्यासाठी आश्चयकार्यक नव्हती. या निवडणुकीत आम्ही कोठेही नव्हतो. आम्ही शिला दिक्षित यांनी केलेले काम दाखवण्याच प्रयत्न केला. मात्र, त्यासही उशीर झाला. सुभाष चोप्रा यांना खूप उशिरा दिल्ली निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली, असे संदीप दिक्षित यांनी सांगितले.   

मागील सहा-सात वर्षात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शिला दिक्षित यांना फक्त नावे ठेवली. त्या सत्तेत असतानाही त्यांचा अपमान करणं  सुरू होतं. जेव्हा तुम्ही असे काम करता आणि नंतर दिल्लीत केलेल्या कामांचे श्रेय घेता, कोण तुमच्यावर विश्वास ठेवेल? असे म्हणत दिक्षित यांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर टीका केली.  

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीत पराभव झाला असला तरी काम करणे सुरूच ठेवणार आहोत, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.