ETV Bharat / bharat

ठरलं..! राधाकृष्ण विखे-पाटील १ जून रोजी करणार भाजप प्रवेश - महाजन

३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर १ जून रोजी विखे-पाटील भाजप प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) मुंबई येथे केली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील आणि गिरीश महाजन
author img

By

Published : May 28, 2019, 4:19 PM IST

Updated : May 28, 2019, 6:05 PM IST

मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील १ जून रोजी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) मुंबई येथे केली आहे. ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर १ जून रोजी विखे-पाटील भाजप प्रवेश करणार आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई येथील महाजन यांच्या निवासस्थानी गिरीश महाजन आणि विखे-पाटील यांची बैठक झाली. बैठकीला अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले खासदार सुजय विखे-पाटीलही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच २५ एप्रिलला विखे-पाटील यांनी राहुल गांधीकडे राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनीही त्यांचा राजीनामा मंजूर केला होता. त्यामुळे पुत्र सुजयच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजप प्रवेशाच्या बातम्या येत होत्या. विखे-पाटलांनीही याबाबत वेळोवेळी संकेत दिले होते. आज याबाबत गिरीश महाजन यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.