ETV Bharat / bharat

राज्यसभेच्या चार जागांसाठी कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपमध्ये घमासान

author img

By

Published : Jun 6, 2020, 9:50 PM IST

नुकतेच जनता दल(धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख कुमारस्वामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फसन्समध्ये दिसून आले. त्यामुळे कर्नाटकात भाजपला काँग्रेस आणि जनता दल मिळून टक्कर देऊ शकतात.

राज्यसभा निवडणूक
राज्यसभा निवडणूक

नवी दिल्ली - राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जूनला निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधी कर्नाटकातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. काँग्रेसने मल्लीकार्जुन खर्गे यांचे नाव जाहीर केले आहे, तर विरोधी पक्षाने माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांचे राज्यसभेच्या जागेसाठी नाव पुढे केले आहे. भाजपला कमी जागा मिळाव्या म्हणून काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

नुकतेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख कुमारस्वामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फसन्समध्ये दिसून आले. त्यामुळे कर्नाटकात भाजपला काँग्रेस आणि जनता दल मिळून टक्कर देऊ शकतात. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांच्याची चर्चा केली असून निवडणूकीत विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसकडे 68 मते आहेत. त्यावर ते फक्त एका सदस्याला लोकसभेवर निवडणून देऊ शकतात. मात्र, दुसऱ्या सदस्याला निवडून देण्यासाठी काँग्रेस जेडीएसशी हातमिळवणी करण्याचा विचार करत आहे.

खर्गे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या यांनी पाठिंबा दिला आहे. भाजप खर्गे यांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, हे दिल्लीतील हायकमांडच्या गळी उतरवण्यात खर्गे यशस्वी झाले असून कोणत्याही परिस्थिती त्यांचा विजय होईल याची काँग्रेसकडून काळजी घेण्यात येईल, अशी वातावरण तयार केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.