नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक: सोनिया गांधींसह ४० स्टार प्रचारक उतरणार मैदानात
आम आदमी पक्ष आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुक: सोनिया गांधीसह ४० स्टार प्रचारक मैदानात
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधीसह अनेक दिग्गज भाजप नेत्यांची नावांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय प्रियंका गांधी, माजी पंजाब राज्याचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू, शशी थरूर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही प्रचार मोहिमेत सहभागी केले आहे. काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, भुपेश बाघेल, अशोक गहलोत, कमल नाथ, व्ही. नारायणस्वामी यांचा समावेश आहे. तसेच राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, खुशबू सुंदर, नगमा मोरारजी, गुलाम नबी आझाद. नदीम जावेद, किर्ती आझाद यांचा समावेश करण्यात आला आहे.