नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेची (न्याय) घोषणा केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेऊन या प्रकारची योजना जनतेची फसवणुक करेल, असे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही योजना अधिक स्पष्ट करून दिली आहे.
स्वतंत्र भारतात गरीबी दुर करण्यासाठी ही जगातील एकमेव योजना आहे, असे सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये प्रति वर्ष देण्यात येईल. या योजनेची रक्कम सरळ त्या कुटुंबातील गृहीणींच्या खात्यात जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कोणत्याही प्रकारची सब्सिडी बंद होणार नाही किंवा कोणतीही योजना थांबवली जाणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
योजने बद्दल हेही स्पष्टीकरण -
देशातील २० टक्के गरीबांना मिळणार फायदा.
कुटुंबातील गृहीणींच्या खात्यात जाणार योजनेची रक्कम.
शहर आणि गावातील गरीबांना भेदभाव न करता मिळार योजनेचा फायदा.
गरीबांसाठी देशातील सर्वात मोठी योजना 'न्याय'.
काँग्रेसने घोषित केलेल्या न्याय योजनेवर भाजपने टीका केल्यावरुन रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः स्विकारले आहे की ७० वर्षाच्या कार्यकाळात करीबी ७० टक्क्यावरुन २२ टक्क्यापर्यंत आली आहे.
न्यायाचा दवा ठोकणाऱ्या मोदींनी सांगावे ते न्यायाचे पक्षधर आहेत किंवा नाही. मोदी १० लाखांचा सुट घालू शकताता मग गरीबांना ७२ हजार का देऊ शकत नाही. देशातील जनेतेचे ५ हजार कोटी प्रचारासाठी खर्च करू शकतात तर न्याय योजनेचा विरोध का. मोठ्या उद्योगपतींचे कोटींचे कर्ज माफ करता येतात मग शेतकऱ्यांचे का नाही? असे अनेक प्रश्न यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर दागले आहे.