ETV Bharat / bharat

निती आयोगाच्या बैठकीपूर्वी काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मनमोहन सिंग यांचे मार्गदर्शन - prime minister

भेटीत कर्जमाफीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याआधी शुक्रवारी रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी गहलोत, बघेल आणि नारायणस्वामी यांनी निती आयोगासंदर्भात चर्चा केली होती.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेताना मुख्यमंत्री
author img

By

Published : Jun 15, 2019, 4:56 PM IST

नवी दिल्ली - निती आयोगाच्या संचालन परिषदेच्या बैठकीपूर्वी काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहसिंग यांची भेट घेतली. भेटीत निती आयोगातील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि पुद्दूचेरीचे मुख्यमंत्री वी नारायणस्वामी यावेळी उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यावेळी गैरहजर होते. काँग्रेसच्या सुत्रांनुसार भेटीत मनमोहन सिंग यांचे मार्गदर्शन घेताना काँग्रेसशासित राज्यात शेतकऱ्यांशी निगडीत मुद्यांवर चर्चा केली. यामध्ये कर्जमाफीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याआधी शुक्रवारी रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी गहलोत, बघेल आणि नारायणस्वामी यांनी निती आयोगासंदर्भात चर्चा केली होती.

आज शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची पाचवी बैठक पार पडणार आहे. बैठकीत दुष्काळ, कृषी क्षेत्रातील संकटे, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षा, जिल्हाचे कार्यक्रम आणि खरीप हंगामासाठीची तयारी याबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीसाठी राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित राज्यांचे उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.