ETV Bharat / bharat

'नोटाबंदी अन् जीएसटीबाबत केंद्र सरकारने आपले अपयश स्वीकारले पाहिजे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जीडीपी घसरणीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमाबद्दल स्पष्टीकरण देण्याबरोबरच नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील अपयश स्वीकारले पाहिजे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
author img

By

Published : May 30, 2020, 8:28 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जीडीपी घसरणवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा ४ टक्क्यांहून कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्याहून अधिक वाईट घसरून विकासदर ३.१ राहिला आहे. सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमाबद्दल स्पष्टीकरण देण्याबरोबरच नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील 'अपयश' स्वीकारले पाहिजे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

  • We had forecast that GDP for Q4 will touch a new low at below 4 per cent

    It has turned out to be worse at 3.1 per cent.

    — P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जीडीपीची जाहीर झालेली आकडेवारी म्हणजे सरकारने केलेल्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन आहे. तसेच ही आकडेवारी लॉकडाऊनच्या पूर्वीची आहे. केवळ शेवटच्या सात दिवसात लॉकडाऊन होते. आपल्या देशात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ होण्यापूर्वीच अर्थव्यवस्था ढासाळली होती, असेही ते म्हणाले.

नोटाबंदी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर लादल्या गेलेल्या जीएसटीमुळे अर्थव्यवस्था बिघडली. तसेच सरकारने पुढाकार घेत जीएसटी आणि नोटाबंदी बाबत अपयश स्वीकारले पाहिजे, असेही चिदंबरम म्हणाले.

  • Remember, this is pre-lockdown. Of the 91 days of Q4, lockdown applied to only to 7 days.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील शेवटच्या तिमाहीत ३.१ टक्के विकासदराची नोंद झाली आहे. हा गेल्या सहा वर्षामध्ये असलेल्या तिमाहीमध्ये सर्वात कमी विकासदर आहे. मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ५.७ टक्के विकासदराची नोंद झाली आहे.आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६.१ टक्के विकासदराची नोंद झाली होती. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४.२ टक्के विकासदर नोंदविण्यात आला आहे. हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.