ETV Bharat / bharat

2022 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; सात स्वतंत्र समित्यांची घोषणा

author img

By

Published : Sep 7, 2020, 1:33 PM IST

मध्य प्रदेश काँग्रेसने रविवारी सात स्वतंत्र समित्यांची घोषणा केली. या नवीन स्थापन झालेल्या समित्यांमध्ये जितिन प्रसाद आणि राज बब्बर यांच्यासारख्या नेत्यांची नावे गायब आहेत. तर 27 वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस
मध्य प्रदेश काँग्रेस

नवी दिल्ली - मध्य प्रदेश काँग्रेसने रविवारी सात स्वतंत्र समित्यांची घोषणा केली. यामध्ये जाहीरनामा समिती, आउटरीच समिती, सदस्यता समिती, कार्यक्रम अंमलबजावणी समिती, प्रशिक्षण समिती, पंचायत निवडणूक समिती आणि उत्तर प्रदेशसाठी माध्यम समिती यांचा समावेश आहे. या नवीन स्थापन झालेल्या समित्यांमध्ये जितिन प्रसाद आणि राज बब्बर यांच्यासारख्या नेत्यांची नावे गायब आहेत. याचबरोबर माजी खासदार आरपीएन सिंह यांचेही नाव वगळण्यात आले आहे.

काँग्रेस अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेल्या 23 वरिष्ठ नेत्यांमध्ये जितिन आणि राज बब्बर हे होते. तसेच गुलाम नबी आझाद यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱया नेत्यांना समित्यांमध्ये जागा मिळाली आहे. दरम्यान, जितिन प्रसाद आणि राज बब्बर यांना म्हत्त्वपूर्ण भूमिका देण्यात येणार असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. नवीन स्थापन झालेल्या समित्यांमध्ये 27 वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले जितिन प्रसाद हे काँग्रेस कार्यकारी समितीचे खास सदस्य आहेत. परंतु उत्तर प्रदेश काँग्रेसच्या राजकारणामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 विधानसभा निवडणुकांसाठी जनमत घेतल्यानंतर पक्ष जाहीरनामा तयार करेल आणि तो निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी जाहीर होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.