नवी दिल्ली - महात्मा गांधी यांचा खून करणाऱया नथूराम गोडसे याला पहिला दहशतवादी म्हटल्याबद्दल अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलले होते.
दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल हसन यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यांनी हिंदू धर्माला दहशतवादाशी संबंध जोडला आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.