लखनौ - बुलंदशहरमध्ये दोन साधूंच्या हत्येच्या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनेची सविस्तर माहिती द्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना केली आहे.
-
CM श्री @myogiadityanath जी ने ग्राम पगौना, अनूपशहर, बुलंदशहर में हुई हत्या की घटना का संज्ञान लेते हुए DM, SSP व अन्य वरिष्ठ अधिकारियों को तत्काल मौके पर पहुँचकर घटना के सम्बन्ध में विस्तृत आख्या देने व दोषियों के विरुद्ध सख्त से सख्त कार्रवाई सुनिश्चित करने के निर्देश दिए हैं। https://t.co/qATR3kguBF
— Government of UP (@UPGovt) April 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CM श्री @myogiadityanath जी ने ग्राम पगौना, अनूपशहर, बुलंदशहर में हुई हत्या की घटना का संज्ञान लेते हुए DM, SSP व अन्य वरिष्ठ अधिकारियों को तत्काल मौके पर पहुँचकर घटना के सम्बन्ध में विस्तृत आख्या देने व दोषियों के विरुद्ध सख्त से सख्त कार्रवाई सुनिश्चित करने के निर्देश दिए हैं। https://t.co/qATR3kguBF
— Government of UP (@UPGovt) April 28, 2020CM श्री @myogiadityanath जी ने ग्राम पगौना, अनूपशहर, बुलंदशहर में हुई हत्या की घटना का संज्ञान लेते हुए DM, SSP व अन्य वरिष्ठ अधिकारियों को तत्काल मौके पर पहुँचकर घटना के सम्बन्ध में विस्तृत आख्या देने व दोषियों के विरुद्ध सख्त से सख्त कार्रवाई सुनिश्चित करने के निर्देश दिए हैं। https://t.co/qATR3kguBF
— Government of UP (@UPGovt) April 28, 2020
दरम्यान, जिल्ह्यातील अनुपशहर कोतवाली क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शिव मंदिराच्या परिसरात झोपलेल्या दोन साधूंची धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आपला चिमटा चोरल्याने या साधूंनी एका युवकाला झापले होते, या नशेबाज युवकाने साधूंचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे दोन साधू या मंदिरात बऱ्याच काळापासून राहात होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या शिवमंदिरातील साधूंचा चिमटा काही दिवसापूर्वी या नशेबाज युवकाने चोरला होता. याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही साधूंनी या युवकाला जाब विचारला होता. तसेच, पुन्हा असे न करण्याबाबत बजावले होते. याच रागातून या युवकाने साधूची हत्या केली असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.