ETV Bharat / bharat

पाऊस लांबला तरी गोव्यामध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही - मुख्यमंत्री सावंत

खाण खंदकातील पाणी कायमस्वरूपी वापरता यावे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Jun 11, 2019, 2:23 PM IST

पणजी - पाऊस लांबणीवर गेला तरी गोव्याला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल एवढा साठा राज्यातील ४ प्रमुख धरणात उपलब्ध आहे. तसेच चार खाण खंदकातून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरविले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. पणजीतील 'महालक्ष्मी' या मुख्यमंत्री निवासस्थानी जलस्त्रोत विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात ९ ठिकाणी जलशुद्धीकरण केले जाते. यामध्ये दररोज ६५० एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. त्यामधून ६३० एमएलडी पाणी वापरण्यायोग्य मिळते. त्यापैकी ५८४ एमएलडी पाण्याचा उपयोग होतो. ९० टक्के घरगुती, तर १० टक्के पाणी अन्य कामांसाठी वापरले जाते. त्याशिवाय ३० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवला जातो. तसेच सोमेश्वर, सडा, सातलण आणि कोडाली या ४ खाण खंदकातून २४ तास पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवले जाते. त्यामुळे गोव्याला आज घडीला पाण्याची कमतरता नसल्याचे सावंत म्हणाले. तसेच खाण खंदकातील पाणी कायमस्वरूपी वापरता यावे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या वापरात असलेल्या चार खाण खंदकांबरोबरच अन्य ठिकाणी असलेल्या अशा खंदकांचा शोध घेतला जाईल. यासाठी केंद्रीय खाण मंत्र्यालय, पर्यावरण मंत्रालयाशी संपर्क साधून हे खंदक बंद न करता कायमस्वरूपी पाणी वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे. त्याबरोबरच पाण्याचा साठा वाढावण्यासाठी पुढील हंगामात राज्यभरात लोकसहभागातून बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही ठिकाणी गरज भासल्यास ड्रेझिंग करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोणत्या धरणातील पाणीसाठी किती दिवस पुरेल?

  1. साळावली - ४४ दिवस
  2. अंजुणे - १९ दिवस
  3. आमठाणे - १२५ दिवस
  4. चाफोली - ४० दिवस

मांडवीचे पाणी वळविण्याचा परिणाम नाही

गोव्याची मुख्य जलवाहिनी मांडवी नदीचे पाणी कर्नाटकने वळवले. त्याचा परिणाम गोव्यातील जलसाठ्यावर झाला असे वाटते का? असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, काही अंशी शक्यता आहे. मात्र, त्यांनी केवळ दोनच नाले वळविले आहेत. त्यामुळे त्याचा जास्त परिणाम झालेला नाही.

Intro:पणजी : पाऊस लांबणीवर पडला तरीही गोव्याला पुरेसा पाणी साठा राज्यातील चार प्रमुख धरणांत उपलब्ध आहे. तरेच चार खाण खंदकातून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरलिले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

Body:पणजीतील ' महालक्ष्मी' या मुख्यमंत्री निवासस्थानी जलस्रोत विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीला गोव्याचे जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, खात्याचे अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले, साळावली (44 दिवस), अंजुणे (19 दिवस), आमठाणे (125 दिवस), पंचवाडी (13 दिवस) आणि चाफोली (40 दिवस) या धरणांत मुबलक पाणी उपलब्ध आहे. राज्यात 9 ठिकाणी जलशुद्धीकरण केले जाते. यामध्ये दररोज 650 एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. ज्यामधून 630 एमएलडी पाणी वापरायोग्य मिळते. ज्यामधील 584 एमएलडी पाणी उपयोग होतो. ज्यामधील 90 टक्के घरगुती तर 10 टक्के अन्य कामांसाठी पाणी वापरले जाते. त्याशिवाय 30 एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवले जाते. तसेच सोमेश्वर, सडा, सातलण आणि कोडाली या चार खाण खंदकातून 24 तास पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवले जाते. त्यामुळे गोव्याला आज घडीला पाण्याची कमतरता नाही.
खाण खंदकातील पाणी कायमस्वरूपी वापरता यावे यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, सध्या वापरात असलेल्या चार खाण खंदकांबरोबरच अन्यत्र असलेल्या अशा खंदकांचा शोध घेतला जाईल. यासाठी केंद्रीय खाण मंत्र्यालय, पर्यावरण मंत्रालयाशी संपर्क साधून हे खंद बंद न करत कायमस्वरूपी पाणी वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागण करण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळ पाठविण्यात येणार आहे. त्याबरोबरच पाण्याचा साठा वाढावा यासाठी पुढील हंगामात राज्यभरात लोकसहभागातून बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही ठिकाणी गरज भासल्यास ड्रेझिंग करण्यात येईल. तसेच पावसाळ्यातील पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी लोकांना प्रव्रूत्त करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
म्हादई पाणी वळविण्याचा परिणाम नाही
गोव्याची मुख्य जलवाहिनी 'म्हादई' (मांडवी) नदीचे पाणी कर्नाटकने वळविल्याचा परिणाम गोव्यातील जलसाठ्यावर परिणाम झाला असे वाटते का?, असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, काही अंशी शक्यता आहे. परंतु, त्यांनी केवळ दोनच नाले वळविले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.