नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक उद्या (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान भाजपने लोकसभा सदस्यांना हजर राहण्याबाबत व्हीप जारी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक मागील लोकसभेमध्ये पास झाले होते. मात्र, मोदी सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर विधेयक व्यपगत झाले होते. त्यामुळे आता विधेयक नव्याने लोकसभेत मांडले जात आहे. ९ ते १२ तारखेपंर्यंत लोकसभेत हजर राहण्याबाबतचा व्हीप भारतीय जनता पक्षाने आपल्या सदस्यांना जारी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने लोकसभेतील रणनिती आखण्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी आज बैठक बोलावली होती. त्यामुळे उद्या लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाले तर नागरिकत्व कायदा १५५५ मध्ये बदल होणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिम स्थलांतरीत नागरिकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यता, हिंदू, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन आणि जैन धर्मातील स्थलांतरीत नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळताना नियम शिथील होणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत, भाजपने जारी केला व्हीप - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक
नागरिकत्व सुधारणा विधेयक उद्या (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने रणनिती आखण्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी आज बैठक बोलावली होती.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक उद्या (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान भाजपने लोकसभा सदस्यांना हजर राहण्याबाबत व्हीप जारी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक मागील लोकसभेमध्ये पास झाले होते. मात्र, मोदी सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर विधेयक व्यपगत झाले होते. त्यामुळे आता विधेयक नव्याने लोकसभेत मांडले जात आहे. ९ ते १२ तारखेपंर्यंत लोकसभेत हजर राहण्याबाबतचा व्हीप भारतीय जनता पक्षाने आपल्या सदस्यांना जारी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने लोकसभेतील रणनिती आखण्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी आज बैठक बोलावली होती. त्यामुळे उद्या लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाले तर नागरिकत्व कायदा १५५५ मध्ये बदल होणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिम स्थलांतरीत नागरिकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यता, हिंदू, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन आणि जैन धर्मातील स्थलांतरीत नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळताना नियम शिथील होणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत, भाजपने केला व्हीप जारी
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक उद्या(सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी कडा़डून विरोध केला आहे. दरम्यान भाजपने लोकसभा सदस्यांना हजर राहण्याबाबत व्हीप जारी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक मागील लोकसभेमध्ये पास झाले होते. मात्र, मोदी सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर विधेयक व्यपगत झाले होते. त्यामुळे आता विधेयक नव्याने लोकसभेत मांडले जात आहे. ९ ते १२ तारखेपंर्यंत लोकसभेत हजर राहण्याबाबतचा व्हीप भारतीय जनता पक्षाने आपल्या सदस्यांना जारी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने लोकसभेतील रणनिती आखण्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी आज बैठक बोलावली होती. त्यामुळे उद्या लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाले तर नागरिकत्व कायदा १५५५ मध्ये बदल होणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिम स्थलांतरीत नागरिकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यता, हिंदु, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्च आणि जैन धर्मातील स्थलांतरीत नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळताना नियम शिथील होणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे.