ETV Bharat / bharat

गोव्यात नाताळ सणाचा उत्साह; मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी

गोव्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी स्थानिकांबरोबरच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी पणजीतील 'अवर लेडी ऑफ इमेक्युलेक कन्सेप्शन चर्च'मध्ये मंगळवारी 11.30 वाजता प्रार्थना सभेला कॅरल गायनाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर बायबलमधील उतारे वाचण्यात आले.

church
अवर लेडी ऑफ इमेक्युलेक कन्सेप्शन चर्च
author img

By

Published : Dec 25, 2019, 8:02 AM IST

Updated : Dec 25, 2019, 8:35 AM IST

पणजी - येशू ख्रिस्ताच्या जन्म दिनाच्या उत्सवाला अर्थात नाताळाला आज मध्यरात्रीच्या प्रार्थनेने सुरवात करण्यात आली. गोव्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी स्थानिकांबरोबरच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फादर वॉल्टर डीसा

राजधानी पणजीतील 'अवर लेडी ऑफ इमेक्युलेक कन्सेप्शन चर्च'मध्ये मंगळवारी 11.30 वाजता प्रार्थना सभेला कॅरल गायनाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर बायबलमधील उतारे वाचण्यात आले. रात्री 12 वाजता फादर वॉल्टर डीसा आणि सहकाऱ्यांनी बालक येशूच्या प्रतिमेला चर्चच्या समोर तयार केलेल्या गोठ्यात नेऊन ठेवले. त्याला प्रणाम करून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा - मुंबईतील 'हे' चर्च ठरत आहे नाताळचे खास आकर्षण

नाताळ सणाविषयी माहिती देताना फादर वॉल्टर डीसा म्हणाले, "नाताळ म्हणजे येशूचा जन्म दिवस. कॅथलीक चर्चमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यासाठी महिनाभरापूर्वीच तयारी केली जाते. नाताळ साजरा करण्यासाठी सर्वजण चर्चमध्ये जमतात आणि रक्षणकर्ता म्हणून येशूची प्रार्थना करतात. जगात शांती आणि सौहार्द नांदावे, यासाठी प्रार्थना केली जाते" गोव्यात प्रत्येक छोट्या-मोठ्या चर्चमध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये, परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात सहकुटुंब सहभागी झाले आहेत.

पणजी इमेक्युलेक चर्चेचे फादर वॉल्टर डीसा खिस्त जन्म आणि नाताळाची माहिती देताना. त्यानंतर शुभेच्छा व्यक्त केल्यात.
Last Updated : Dec 25, 2019, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.