पाटणा - बिहार विधानसभा निवडणूकीत सुरुवातीपासूनच लोकजन शक्ती पक्षाचे (लोजपा) अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. चिराग यांनी हे सुद्धा म्हटले की, नीतिश कुमार यापुढे कधीच बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत. तर, विविध वृत्त वाहिन्यांच्याद्वारे आलेल्या एक्झिट पोलनुसार, बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ नीतिश कुमार यांच्या गळ्यात पडणार नसल्याचे चित्र आहे.
नीतिश कुमार यांच्या अहंकाराची हार होणार - चिराग
एक्झिट पोलची आकडेवारी आल्यानंतर चिराग पासवान यांनी प्रसिद्धी पत्रक काढले. यात त्यांनी म्हटले की, लोजपा एनडीएमध्ये राहिली असती तर नीतिश यांना जीवनदान मिळाले असते. मात्र, ते बिहारसाठी भल्याचे नव्हते. नीतिश कुमार यांच्या पक्षाला लोजपा 60 जागांवर पराभूत करणार आणि नीतिश कुमार यांच्या अहंकाराची हार होणार, असे चिराग पासवान यांचे म्हणणे आहे.
लोजपा भाजपासोबत जाणार नाही, हे आधीच भाजपाला सांगितल्याचेही चिराग यांनी म्हटले आहे.
विचाराधारेपासून कधी वेगळे नाही झालो - चिराग
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या सिद्धांतापासून आम्ही मागे हटलो नाही, याचा आम्हाला आनंद असल्याचेही चिराग म्हणाले. 2015मध्ये एनडीएसोबत निवडणूक लढून लोजपाने 2 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी लोजपा स्वबळावर त्यापेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोजपा स्वबळावर निवडणूक लढवून जवळपास 10 टक्के मत मिळवणार आहे. लोजपाच्या उमेदवारांना 60 जागांवर 30 हजारांहून अधिक मते मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - बिहार एक्झिट पोल 2020 : नितीश कुमार-भाजपला धक्का.. आरजेडीप्रणित महागठबंधनला सत्ता !
राजकारणाचे नवे अभ्यासक -
मुख्यमंत्री नीतिश कुमार सातत्याने सांगत आहेत की, चिराग पासवान यांनी कधीच जमिनीवरचे राजकारण नाही केले. आता अशा परिस्थितीत, त्यांनी इतके महत्त्वाचे निर्णय कसे घेतले, ज्यामुळे ते आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणील नवे अभ्यासक म्हणून पुढे येत आहेत.
यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण होत आहेत.
- जनतेला न विचारता 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' व्हिजन डॉक्यूमेंट कसे बनवले ?
- बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आता पुन्हा नीतिश कुमार विराजमान नाही होणार, हा अंदाज त्यांनी कसा लावला?
- 'असंभव नीतिश कुमार' या घोषणेसह कार्यकर्त्यांना काम करायला का सांगितले?
लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेता काय निर्णय घ्यावेत, याचे अभ्यासक म्हणून पुढे येत आहेत. 2020 मध्ये स्वबळावर निवडणूक लढणारा लोजपा एकमेव पक्ष आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला येणार आहेत. त्यादिवशीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होईल.