ETV Bharat / bharat

भारत-चीन सैन्याच्या हाणामारीत चीनचे ४३ जवान ठार - भारत-चीन सीमा न्यूज

भारत-चीन देशांच्या सीमेवर तैनात दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्करातील एक कर्नल व दोन जवानांना वीरमरण आले. या दरम्यान, भारताकडून करण्यात आलेल्या प्रतिकारामध्ये चीनचेही जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. तसेच अनेक गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयकडे सुत्रांनी ही माहिती दिली. मात्र, याबाबत चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर्सची हालचालदेखील वाढली असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.

China suffered 43 casualties in violent face-off in Galwan Valley, reveal Indian intercepts
भारताचे चीनला प्रत्युत्तर, चीनचे ४३ जवान ठार
author img

By

Published : Jun 17, 2020, 7:01 AM IST

Updated : Jun 17, 2020, 7:26 AM IST

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.

मागील कित्येक दिवसापासून भारत व चीनमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रदेशावरून तणाव होता. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले.

  • Indian intercepts reveal that Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face-off in the Galwan valley: Sources confirm to ANI pic.twitter.com/xgUVYSpTzs

    — ANI (@ANI) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उभय देशांमधील तैनात सैनिकांमध्ये चकमक होऊन भारतीय लष्करातील एक कर्नल व दोन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, यावेळी भारतीय सैन्य दलाच्या दणक्याने चीनचेही जवळपास ४३ जवान ठार तसेच अनेक गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयकडे सुत्रांनी ही माहिती दिल्याचे सांगितले. मात्र, याबाबत चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर्सची हालचादेखील वाढली असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर उभय देशांमधील मेजर जनरल दर्जाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू झाली होती, असे लष्करी सूत्रांनी सांगितले होते. भारतीय लष्कराकडून मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पत्रकार परिषद होणार होती, पण ती रद्द करण्यात आली होती. मागील ४५ वर्षांमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, असेही एका लष्करी सूत्राने स्पष्ट केले.

काय घडलं भारत-चीन सीमेवर -

सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अ‌ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.

हेही वाचा - भारत-चीन सैनिकांमधील झटापटीला नवे वळण; तब्बल २० जवानांना वीरमरण..

हेही वाचा - पाच सैनिकांच्या मृत्यूसह 11 जण जखमी झाल्याच्या ट्विटवरून चीन पत्रकाराचा 'यूटर्न'

Last Updated : Jun 17, 2020, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.