ETV Bharat / bharat

अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने बांधली तीन नवी गावे - बम ला पास

ईशान्य भारतात चीनने बांधकाम केल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील भागात चीनने तीन नवीन गावे बांधली आहेत.

china-setup-three-new-villages-near-arunachal-pradesh
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने बांधली तीन नवी गावे
author img

By

Published : Dec 7, 2020, 7:29 AM IST

नवी दिल्ली - चीनने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या बम ला पासजवळ तीन नवीन गावे बांधली आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात हे कृत्य केले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, चीनने केलेले बांधकाम भारत, भूतान आणि चीनच्या सीमेजवळ आहे. या संदर्भात भारतीय संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन यांनी याबद्दलची चौकशी सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही चीन त्याच्या विस्तारवादी धोरणांमुळे प्रश्नांच्या गर्तेत सापडला होता. अलीकडेच, अमेरिकेच्या शीर्ष समितीने लडाखच्या गालवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षाबाबत आपला अहवाल प्रसिद्ध केला. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असे म्हटले आहे की, चीन सरकारने गॅलवान व्हॅलीची संपूर्ण योजना बनविली होती आणि त्यांचा मुख्य उद्देश सुरक्षा दलांना चिथावणी देणे हा होता.

अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाच्या (यूएससीसी) अहवालानुसार, चीनी सरकारने गलवान खोऱ्यात हिंसाचाराची योजना आखली होती, असे काही पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे. तसेच ही योजना राबविण्याच्या वेळी काही लोकांचा मृत्यू होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती.

यावर्षी जूनमध्ये चीनच्या पूर्वेकडील लडाखमध्ये चीनमध्ये पेन्गॉन्ग त्सो भागात चीन आणि भारतीय सैन्यात झटापट झाली. चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीकडून भारतीय सैनिकांनी निशाणा बनवण्यात आले होते. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले होते.

लडाखच्या गालवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले, तर चीनचे 43 हून अधिक सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनने अद्याप हे सत्य सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही.

गलवान हिंसेनंतर सरकारची प्रतिक्रिया -

20.06.2020 : भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नियमात बदल केले. यामुळे एलएसीवर तैनात असलेल्या कमांडरांना संपूर्ण कारवाईचे स्वातंत्र्य दिले.

01.07.2020 :भारताने चीनविरूद्ध आर्थिक हल्ल्याचा प्रयत्न केला. चिनी कंपन्यांना भारतीय महामार्ग प्रकल्पात भाग घेण्याची परवानगी नाकारली. चीन भारतात गुंतवणूक करू शकत नाही तसेच चीनकडून आयात बंद केली गेली.

29.07.2020 : भारत सरकारने ५९ मोबाईल अ‌ॅप्सवर बंदी घातली. यामध्ये मुख्यतः टीक टॉक, यूसी ब्राउझर आणि वेचॅट ​​सारख्या चिनी अ‍ॅप्सचा समावेश होता.

02.09.2020 : भारताने लोकप्रिय गेम पबजीसह ११८ चीनी अ‌ॅप्सवर बंदी घातली.

त्यानंतर अनेक फेऱ्यांच्या बोलणीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी करारही झाला.

तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात पाच कलमी करार -

10.09.2020 : भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चिनचे वांग यी यांनी तणाव शांत करण्यासाठी दोन तास महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

11.09.2020 : भारत और चीन के बीच वास्तविक नियंत्रण रेखा (LAC) पर गतिरोध के संबंध में पांच बिंदु पर सहमति हुई है, जिसमें सैनिकों का विघटन और तनाव कम करना शामिल है. वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) गतिरोधकाबाबत भारत आणि चीन यांच्यात पाच मुद्द्यांवर सहमती दर्शविली झाली. यामध्ये सैन्य कमी करणे आणि तणाव कमी करण्याबद्दल सहमती झाली.

लडाखच्या गलवान खोऱ्यात 14-15 जूनच्या मध्यरात्री रात्री एक हिंसक झटापट झाली. यात भारतीय सैन्याचे २० जवान हुतात्मा झाले. या संघर्षात 43 चिनी सैनिक ठार झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, चीनने ते मान्य केले नाही. नंतर, चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली.

हेही वाचा - 'चीनकडून पाकिस्तानचा भारताविरुद्ध एक साधन म्हणून वापर'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.