आग्रा - कचर्यामध्ये निष्काळजीपणाने फेकले गेलेल्या पीपीई किटवर मुलांनी लाकडे टाकून नेल्याची घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामधून आग्रा येथील कचरा विल्हेवाट लावण्याबाबत आरोग्य विभागाचे असलेलेल दुर्लक्ष उघडकीस आले.
दोन लहान मुले पीपीई किटमध्ये लाकूड टाकून ते ओढत नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. डीआरडीओच्या प्रयोगशाळेच्या एडीआरडीएजवळील स्मशानभूमीत असलेल्या कचराकुंडीत हे वापरलेले पीपीई किट सापडले असल्याचे मुलांनी सांगितले. दरम्यान ते कीट एका नाल्यात फेकून दिल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाग्रस्तांवर वापरलेले पीपीई किट आणि इतर वापरलेल्या वैद्यकीय उपकरणांची काळजीपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे. ज्यासाठी वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाते.