ETV Bharat / bharat

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन - गोवा

पर्रिकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रिकर यांना काही काळ सांभाळला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले.

मनोहर पर्रिकर
author img

By

Published : Mar 17, 2019, 8:14 PM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे. पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर विदेशातही उपचार झाले होते. त्यानंतर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात काही दिवस पर्रिकर दाखल होते. यानंतर त्यांना त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी हलवण्यात आले होते.

दरम्यान, 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर खूप आजारी आहेत. ते बरे होण्याची चिन्हे नाहीत,' असे उपसभापती आणि कलंगुटचे भाजप आमदार मायकेल लोबो यांनी म्हटले होते. 'काल रात्री पर्रिकरांची तब्येत खूपच बिघडल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे सतत लक्ष ठेऊन आहेत. मात्र, ते कधी बरे होतील, हे सांगता येत नाही,' असे लोबो यांनी म्हटले होते.

पर्रिकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रिकर यांना काही काळ सांभाळला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले.

मान्यवरांकडून श्रद्धांजली -
पर्रिकरांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.